भुसावळ – भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयच्या NEP सेल आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने ताप्ती पब्लिक स्कूल, भुसावळ येथे महाराष्ट्र शासनाचे स्कूल कनेक्ट 2.0 अभियान राबवण्यात आले. त्यात नववी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले गेले. सदर कार्यशाळेस महाविद्यालयाचे डॉ. ममताबेन पाटील व डॉ. मनोज कुमार जाधव यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. ममताबेन पाटील यांनी आपल्या व्याख्यानात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील विषय निवडीचे स्वातंत्र्य, मेजर व मायनर डिग्री बद्दल, श्रेयांक पद्धतीबद्दल मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रामध्ये डॉ. मनोज जाधव यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचे आकृतीबंध, शिक्षण पद्धती आणि मूल्यमापन इत्यादी बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेकरिता ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ, पुंडलिक बऱ्हाटे हायस्कूल भुसावळ, ज्ञानज्योती विद्यालय, खडका व इतर शाळा, महाविद्यालयातील असंख्य विद्यार्थ्यांनी व पालकांनी लाभ घेतला.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. डी. एन.पाटील, ताप्ती पब्लिक स्कूलचे प्राचार्य नीना कटलर, उपप्राचार्य मनप्रीत कौर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच NEP सेल प्रमुख डॉ. उमेश फेगडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रफुल्ल इंगोले, सदस्य प्रा. व्ही.ए सोळुंके, व डॉ. एस. एस. कोलते यांचे अनमोल सहकार्य लाभले.



