भुसावळ : भुसावळ शहरातील जाम मोहल्ला परिसरात तरुणाच्या खून प्रकरणी पाच जणांना चार गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली आहे. तसेच ताब्यातील अजून दोघांची चौकशी सुरु आहे. पुर्ववैमनस्यातून ही खूनाची घटना घडली होती. तेहरीम अहमद नासिर अहमद असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव होते.

सलमान अब्दुल मजीद पटेल ऊर्फ रमीज पटेल (रा. पटेल कॉलनी खडका रोड, भुसावळ) याला बल्लारशाह येथून तर गोळीबार करणा-या अदनान शेख युनूस, शेख साहिल शेख रशीद (रा. आगाखान वाडा, भुसावळ), अब्दुल नबी हनीफ पटेल (रा. मास्टर कॉलनी, जळगाव) व सनीस नाईन मोहम्मद आसिफ (रा. एमआयडीसी एरिया, जळगाव) या चौघा संशयितांना मनमाड येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चार गावठी पिस्टल, तिन जिवंत काडतूस व एक पुंगळी हस्तगत करण्यात आली आहे.


