सीमाबंदी पार करत झारखंड येथे जाणाऱ्यां ६० प्रवाशांना भुसावळात अडकविले; टॅक्सीने वीना परवानगी मुंबई ते झारखंड प्रवास : वैद्यकीय पथकाने केली जागेवर तपासणी

भुसावळ (प्रतिनिधी )-
संपूर्ण भारत लॉकडाउन असतांना लागू असलेली संचारबंदी व जिल्हाबंदी ला झुगारत मुंबई येथून झारखंड येथे जाण्याकरीता प्रवास वाहतुकीची परवानगी न घेता मुंबई ते झारखंड प्रवास करणार्‍या तब्बल १२ वाहनातील ६० प्रवाशांना भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी महामार्ग व नाहाटा चौफुली येथे ड्यूटी बजावत असतांना हॉटेल सुहासजवळ हटकले .
झारखंड राज्यातील कामगार हाताला रोजगार नसल्याने खाजगी टॅक्सीने गावाकडे निघाले असून या लोंकाजवळ प्रवासाची कुठलीही परवानगी नसतांना झारखंड येथे जाण्याकरीता निघाले .या १२ टॅक्सी भुसावळातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील हॉटेल सुहास समोर येताच बाजारपेठ पोलिस
सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, एएसआय एजाज पठाण, एएसआय गयासोद्दीन शेख, बंटी कापडणे, प्रशांत परदेशी, सचिन पोळ आदींनी या प्रवाशांना प्रवासाच्या परवानगी बाबत विचारणा केली. असता त्यांच्याकडे कुठलीही परवानगी नसल्याचे समोर आले
यातील ६० प्रवाशांची पोलिसांनी चौकशी केली.
स्थानिक वैद्यकीय पथकाकडून त्यांची जागेवरच तपासणी केली दरम्यान औरंगाबाद , व नाशिक,जळगाव येथेही तपासणी करुनच पुढे रवाना केल्याचे प्रवासी यांनी सांगितले .
सीमाबंदी असतांना सुद्धा प्रवासी कसे बाहेर निघाले यांचे आश्चर्य व्यक्त होत आहे .
भुसावळात प्रवाशांची पथकाकडून जागेवरच वैद्यकीय तपासणी
पोलिसांनी स्थानिक वैद्यकीय प्रशासनाला कळवल्यानंतर त्यांची जागेवरच वैद्यकीय तपासणी करण्यात आली हे प्रवासी सुखरूप असून कोणतेही कोविड १९ ची लक्षणे नसल्याने पुढे रवाना करण्यात आले असून . याप्रवाशांचे जेवणासाठी हाल होउ नये यासाठी पोलिसांनी त्यांच्या जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून रवाना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *