वरणगाव – गेल्या तीन चार दिवसांपासून वरणगाव शहरातील मुस्लिम बांधवांच्या घरांवर रात्री एक ते दोन च्या सुमारास अज्ञात माथेफिरू स्वतः घराच्या गच्चीवर चढून मुस्लिम बांधवांच्या घरावर मागून दगडफेक करीत आहे. या प्रकाराने भयभीत होऊन मुस्लिम बांधवांनी वरणगाव पोलीस स्टेशनला दि. ६ डिसेंबर शुक्रवार रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एनसी नोंद केली आहे. परंतु या प्रकारामुळे वरणगाव शहरात हिंदू मुस्लिम एकतेला तळा जाऊन तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. रात्री दगडफेक करणाऱ्या अज्ञात माथेफिरूला पकडण्यासाठी पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले आहे.

शहरातील मुस्लिम बांधव राहत असलेला बिदाडी मोहल्ला या भागात हिंदू – मुस्लिम बांधवांचे घरे गेल्या ५० वर्षापासून हे भिंतीला भिंत असून गुण्यागोविंदाने नांदत आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी देखील असाच प्रकार घडला या भागात घडला होता. त्यावेळेला रात्री दगडफेक करणारा माथेफिरू मुलगा हा शहरातील एका राजकीय पुढाऱ्याचा नातेवाईक असल्याने तेव्हा ती घटना दाबली गेली असल्याचे मुस्लिम बांधव सांगतात.
-हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्याने वरणगाव नगरपरिषदची निवडणूक देखील लागणार आहे. म्हणून काही माथेफिरू समाजकंटक रात्री मुस्लिम लोकांच्या घरावर अशी दगडफेक करून हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये जातीय दंगल किवा तेढ निर्माण करण्याचा कुटील डाव हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण होऊन सामाजिक ध्रुवीकरण होऊन जातीय दंगली घडतील असा प्रकार सध्या वरणगाव शहरात सुरू आहे.
-दगडफेक करणारा माथेफिरू अंधाराचा फायदा घेऊन पळतो
गेल्या तीन चार दिवसांपासून रात्री एक ते दोन च्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात माथेफिरू हा गच्चीवर उभा राहून मुस्लिम बांधवांच्या घरावर दगडफेक करून पळून जातो. रात्री अचानक आलेल्या दगड फेकीमुळे भयभीत झालेले मुस्लिम बांधव घराबाहेर पडून दगड आलेल्या दिशेकडे पाहणी करण्यासाठी जातात परंतु त्या दिशेने गच्चीवर कोणीही दिसून येत नाही. दगड फेकून हा माथेफिरू अंधाराचा फायदा घेऊन पडून जातो.
-गल्लो-गल्ली झाले दादा; म्हणता मला बाजीराव म्हणा
वरणगाव शहरात आगामी नगरपालिका निवडणूक असल्याने गल्लो- गल्ली सोम्या-गोम्या दादा झाले आहे. त्यांची अशी अवस्था आहे की, त्यांचे घरात कोणी ऐकत नाही’; त्यांच्या घराची अतिशय दयनीय अवस्था असते, त्यांच्या घरात नाही दाना म्हणता मला बाजीराव म्हणा अशी परिस्थिती त्यांची असते आणि ते भांडणात असे दाखवता की आम्हीच सर्व काही करू शकतो. असा प्रकार मागील काही दिवसांमध्ये घडला होता. तेव्हा पण पोलिसांनी कडक भूमिका घ्यायला पाहिजे होती परंतु तेव्हा घेतली नाही.
-पोलिसांची गस्त वाढवा; शहरात सिसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी
शहरात पोलिसांचा धाख उरला नाही आहे. लहान मोठे भांडण झाले की, आरोपींना पोलीस ठाण्यात बोलवल्यानंतर लगेच विविध राजकीय पक्षांचया पुढाऱ्यांचे फोन पोलीस स्टेशनला येत असतात. तो माझा कार्यकर्ता असून त्याला सोडून द्या असे प्रकार मोठ्या प्रमाणात वरणगाव शहरात वाढले आहे. गुन्हा करणारे आरोपी हे सुटून जातात आणि त्यांना याच राजकीय पुढाऱ्यांचे पाठबळ मिळते आणि ते पुन्हा गुन्हेगार बनतात. शहरात संवेदनशील भागात नगरपालिकेच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी मुस्लिम बांधवांनी केली आहे. तसेच दिवसा रात्री पोलिसांची गस्त वाढवून गावात एक पोलीस कर्मचाऱ्यांचे नियुक्ती करावी अशी मागणी या निमित्ताने पुढे आली आहे.



