-भुसावळ – शहरातील नादुरुस्त एलईडी लाईट दुरुस्त करावे तसेच अनेक भागातील तुटलेलें ढापे दुरुस्त करावे यासाठी येथील काँग्रेसच्यावतीने मागणी करण्यात आली असून याबाबत मुख्याधिकारी राजेंद्र फातलें यांना निवेदन देण्यात आले .

शहरात नसरवांजी फाईल, शिवाजी नगर, आगाखान बाडा, जाम मोहल्ला, गौसीया नगर, परीसरातिल एलईडी लाईट २४तास सुरू अस्तात यामुळे विजेची नासाडी होत आहे तसेच गेल्या काही महीन्या पासुन अनेक खांबावरील लाईट बंद आहे ते दुरूस्त होत नाहीत , याबाबत अनेकदा पालिकेत तक्रार करून सुद्दा बंद लाइट दुरुस्त झाले नाहीत. पालिका एमएसईबी कडे बोट दाखवतात व एमएसईबी पालिकेची चुक दाखवतात मात्र लाईट दुरुस्त होत नाही या सर्वाबाबत योग्य ती कारवाई करून लाईट दुरूस्ती करावी तसेच
त डी एल हिन्दी हाईस्कूल , शिवाजी नगर व परिसर , आर के किताब घर व जाम मोहल्ला भागातील अनेक ठिकाणी ढापे तुटलेले आहे ते त्वरित दुरूस्त करण्यात यावे या तुटलेल्या ढाप्या मुळे लोकांना चालणे मुश्किल झाले आहे घटागाडी व प्रसंगी अँब्युलन्स येणे कठीण झाले आहे तरी तुटलेले ढापे त्वरित दुरूस्त करण्यात यावे अशी मागणी येथील काँग्रेसच्यावतीने जिल्हा पदाधिकरी यांनी केली आहे याबाबत मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांना निवेदन देण्यात आले . तसेच जयंतीलाल भामरे ( अधिकक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक कंपनी लीमीटेड) यांना प्रत रवाना केली आहे .
यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी प्रदेश उपाध्यक्ष ,मो मुनव्वर खान , महीला शहर अध्यक्ष यास्मीन बानो,राम अवतार परदेशी, सलीम गवली शहर अध्यक्ष, संजय खडसे,महेबुब खान, जानी गवली, विलास खरात, वंदना चव्हाण सुजाता सपकाळे हमीदा गवली यांचेसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते



