प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांना नोकरीत समाविष्ट करावे – शिवसेना उबाठाने दिले निवेदन :

भुसावळ – भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र यांचे अखत्यारीत जे प्रकल्प ग्रस्त गावे येतात त्या गावमधिल शेतकरी बांधवांना आजपावेतो नोकरीत समाविष्ट करुन घेण्याचा जीआर असून सुद्धा समाविष्ट करुन घेत नाहीत त्यावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने सहा दिवसाचा लेखी स्वरूपात इशारा दिला जर या प्रकल्प ग्रस्त बांधवांना सहा दिवसात नोकरीत समाविष्ट न केल्यास शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत , सह संपर्क प्रमुख विजय परब , जिल्हा प्रमुख दिपक सिंग राजपूत , विधानसभा संपर्क प्रमुख संजय गोवेकर , जिल्हा संघटक गजानन मालपुरे, उप जिल्हा प्रमुख विलास मुळे,,यांचे प्रमुख मार्गदर्शनात तालुक्यांतील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना सोबत घेऊन,रस्त्यावर उतरू व आपल्या दालना समोर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला तसेच अन्य काही महत्वपुर्ण विषयांवर चर्चा करण्यात आल्यात,

आज दिनांक 23/09/24 रोजी शिवसेनेचे नवनिर्वाचित तालुका प्रमुख निलेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव शहर प्रमुख सुनील भोई,, उप तालुका प्रमूख रहीम भाई गवळी, राजेश महाजन,कृष्णा चौधरी,, मनोज जाधव, निलेश चौधरी,सह शिवसैनिक उपस्थित होते . आंदोलनं करते वेळेस काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास औष्णिक विद्युत प्रकल्पातील अधिकरी जबाबदार राहतील याची नोंद प्रशासनाने घ्यावी असे तालुका प्रमूख नीलेश महाजन यांनी सांगितले.