भुसावळ : शासनाच्या ‘ हॉट सिटी ‘ दिपनगर येथून वाहणारी राख वेल्हाळे राखेच्या बंडात सोडण्यात आली आहे . जुन्या व नव्या राखेच्या बंडातून राखेच्या उत्खाना साठी रात्रीच्या वेळेस येणाऱ्या वाहनांमुळे वन्यजीव प्राण्यांचा अपघात होऊन मृत्युमुखी पडत आहे याप्रकार त्यांच्या जीवाशी ‘ खेळ ‘ केला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे . वन विभागाचे मात्र याकडे ‘अर्थ ‘पूर्ण दुर्लक्ष होत असून प्रदूषण सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

तालुक्यातील दिपनगर येथून 13 ते 14 किलोमीटर अंतरावरील वेल्हाळे परिसरात दीपनगर येथील पाणी मिश्वीत राख सोडण्यासाठी मोठा बंड करण्यात आला आहे. या परिसरात प्रामुख्याने तस्तम प्राणी , वन्यजीव प्राणी , राष्ट्रीय पक्षी मोर , अजगर , नीलगाय आदी प्राण्यावर त्याचा परिणाम होत आहे. या प्राण्यांना जीवदान देण्याची गरज असताना मात्र वन विभागाकडून राजकीय व आर्थिक संबंध जोपासून या प्राण्यांची शिकार होत असताना त्याकडे वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात येत आहे.
दिपनगर औष्णिक केंद्राकडून अश बँड मध्ये पाणी सोडले जाते . वेल्हाळे हद्दी असलेल्या जुन्या राखेच्या बंडातून जो वनविभागाच्या कार्यकक्षेत असून त्यामधून राखेची सर्रास वाहतूक केली जात आहे. रात्रीच्या वेळेस काळोखात दररोज अनेक वाहनांमधून अवैधरीत्या ही राख वाहून नेली जात आहे. यावेळी राखेसोबतच वन्यजीव प्राण्यांचा खेळ केला जात आहे .या अवैध राखेच्या वाहतुकीमुळे वन्य प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे . मात्र तरीही दीपनगर औष्णिक केंद्राच्या अधिकाऱ्यांसह महसूल व वन दूरक्षेत्र अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे . तरी संबंधितांची चौकशी करून जिल्हास्तरावरून पथक नेमून कारवाई करण्यात यावी , अशी मागणी केली जात आहे.


