भुसावळ (प्रतिनिधी )
अवघ्या विश्वात ज्याने हाहाकार माजवला अश्या कोरोना व्हायरसने आधीच भयभीत झालेल्या नागरिकांची सदय स्थिती अतिशय भयावह आहे. त्यात मंगळवार रोजी शहरात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली .यामुळे नागरिकां मध्ये अजूनच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एवढेच नव्हे तर अचानक आलेल्या या पावसाने
पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्गातुन वक्त होत आहे.
शेतामध्ये शेतकऱ्यांचे गहू व हरभरा पिक तयार होण्याच्या मार्गावर असून या अवकाळी पावसामुळे पिक खराब होऊन नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे कोरोना व दुसरीकडे निसर्गाचा कोप यात जनता चांगलीच भरडली जात आहे . वातावरणात झालेल्या या बदलामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला .



