हतनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्ण उघडले : सतर्कतेचा इशारा : तापी नदीपात्रात होतोय 48 हजार 134 क्युसेक पाण्याचा विसर्ग

हतनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्ण उघडले : सतर्कतेचा इशारा
तापी नदीपात्रात होतोय 48 हजार 134 क्युसेक पाण्याचा विसर्ग

भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या हतनूर धरणाचे बुधवारी दुपारी 4 वाजेपासून उघडण्यात आलेले 12 दरवाजे पूर्णपणे गुरुवारपर्यंत कायम उघडे होते त्यामुळे तापी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात 24 तासात दमदार पाऊस झाल्यामुळे 14 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. यातून 48 हजार 134 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

असून, या धरणावर वीज निर्मिती, सिंचन, रेल्वे तसेच नगरपालिका पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. अशा या महत्त्वाच्या हतनूर धरणात असलेल्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. त्यामुळे बुधवारी दुपारी 4 वाजेपासून हतनूर धरणाचे 12 दरवाजे पूर्णपणे दुपारी 4 वाजेला उघडण्यात आलेले होते, ते अजूनही कायम आहेत.

हतनूरमध्ये 24 तासात 106.46 दलघमी पाण्याची आवक होती. गुरुवारी पाणी पातळी 380 मीटर – झालेली असताना एकूण पाणीसाठा 219.20 दलघमी तर एकुण उपयुक्त पाणीसाठा 76.20 टक्के नोंदवण्यात आला. तर 48134 क्युसेकने पाणी विसर्ग करण्यात येत आहे. हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे.