मानोरा येथे ‘व्हॉईस ऑफ मिडिया’ची तालुकास्तरीय बैठक : शिर्डी अधिवेशना संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा; पत्रकार पाल्यांना शालेय साहित्याचे वितरण

मानोरा/वाशीम : आगामी काळात शिर्डी येथे होवू घातलेल्या पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाºया ‘व्हॉईस ऑफ मिडिया’च्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर संघटनेची तालुकास्तरीय बैठक आज २८ रोजी मानोरा येथे पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष भागवत मापारी यांच्या अध्यक्षस्थतेखाली पार पडलेल्या बैठकीत अधिवेशना संबंधाने पदाधिकाºयांशी चर्चा करुन पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
शिर्डी येथे होवू घातलेल्या ‘व्हॉईस ऑफ मिडिया’च्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर मानोरा तालुका यांच्या वतीने रविवारी येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला जिल्हाध्यक्ष भागवत मापारी, विदर्भ कार्याध्यक्ष विठ्ठल देशमुख, इलेक्ट्रॉनिक विंगचे पदाधिकारी गणेश मोहळे, मनोज जयस्वाल, उपाध्यक्ष आकाश शिंदे, मानोरा तालुकाध्यक्ष वसंत राठोड आदिंची प्रमुख उपस्थिती होती‌. यावेळी अधिवेशनाला तालुक्यातून किती पत्रकार येणार व त्या दृष्टीने वाहन व्यवस्था इतर अत्यावश्यक सामुग्री सोबत घेण्याबाबतची माहिती जिल्हाध्यक्ष व पदाधिकाºयांनी जाणून घेतली. दरम्यान, पत्रकारांच्या पाल्यांना ‘व्हॉईस ऑफ मिडिया’च्या वतीने देण्यात येत असलेल्या शैक्षणिक साहित्य किटचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांच्या हितासाठी झटणारी ‘व्हॉईस ऑफ मिडिया’ही एकमेव संघटना असल्याची भावना स्थानिक पदाधिकाºयांनी बोलून दाखविली तर शालेय साहित्य मिळाल्याचा आनंद पत्रकार पाल्यांच्या व कुटुंंबियांच्या चेहºयावर दिसून आला. या बैठकीला तालुकाध्यक्ष वसंत राठोड, योगेश देशमुख, अनिल राठोड, राजु ठाकरे, बबनराव देशमुख, हरिष खडकीकर, निखिल वानखेडे, महेश जाधव, शंकर आढे, सुरेश जाधव, विशाल मोरे आदिंसह व्हॉईस ऑफ मिडियाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.