भुसावळ – सद्ध्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात धन दांडग्या उमेदवारांकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या बातम्या वृत्तपत्रातून व टिव्ही वररोज फोटो सह प्रसिद्ध होत आहे त्या जर खऱ्या असतील तर हा शिक्षणक्षेत्रात लागलेला कलंक आहे आजपर्यंत गुपचूप घाबरून असे काही कदाचित होत असेलही पण आता तर खुलेआम होत आहेत केव्हडे हे निर्लज्ज धाडस! ग्रामपंचायत निवडणुकीतही असे प्रकार ऐकिवात नाहीत ते शिक्षक मतदार संघात व्हावेत हे ह्या देशाचे दुर्दैव तर आहेच पण राष्ट्राच्या अधोगतीची सूचना देणारी पाहिली घंटा आहे हे निश्चित!अशिक्षित,गरीब मतदारांना प्रलोभन दिले जात असेल अशीच निदान माझी तरी आजपर्यंत समजूत होती पण उच्च पदवीधर,अन् लाखाच्या घरात दरमहा वेतन घेणाऱ्या शिक्षकांनी असे करावे ह्याचा निषेध करायलाही शब्द नाहीत.ज्यांनी समाजाला मार्गदर्शन करावे तेच नीच पातळी वर येवून क्षणिक सुखासाठी आपल्या पवित्र,क्षेत्राला कीड लावत असतील तर काळ ही त्यांना क्षमा करणार नाही आणि आणखी कहर म्हणजे एव्हढे सगळे जाहीर होवून देखील आपले निवडणूक आयोग ,पोलिस खाते मात्र झोपेचे साँग घेवून मौन पळून आहे कागदोपत्री नेहमी प्रमाणे चौकशी सुरू असल्याचे नाटक मात्र रंगवीत आहे का नाही सापडत ह्यांना दोषी आरोपी?अश्याने ह्याही यांत्रणेवरचा विश्वास दुभांगणार नाही तर काय होईल!मूठभर नत भ्रष्ट शिक्षकानं मुळे सारे पवित्र शिक्षणक्षेत्रात च आज कलंकित होत आहे .ह्या दुर्दैवी घटनांची सत्यता लवकरात लवकर चव्हाट्यावर आणून दोषींवर कडाक कारवाई झाली तर आणि तरच सामान्य लोकांचा लोकशाहीवर असलेला थोडाफार विश्वास तरी टिकून राहील ,अशी अपेक्षा तरी करावी का ?असा संतप्त सवाल शिक्षणतज्ज्ञ प्र ह दलाल यांनी व्यवस्थेला विचारला आहे।



