विजेच्या कडकडासह अवकाळी पावसामुळे यावल तालुक्यात शेतकऱ्यांचे नुकसान :


यावल – यावल तालुक्यात दहिगाव, मोहराळा,वड्री परसाडे परिसरात काल दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने गहु पिकांचे नुकसान झाल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावल तालुक्यात दहिगाव,मोहराळा, वड्री,परसाडे,हिंगोणा,डोंगर कठोरा,बोरखेडा या सह ईतर परिसरात दि. २६ सोमवार रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यारासह पाऊस झाल्याने कापणीला आलेला गहु पीक आडवे पडले त्याच बरोबर हरभरा पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रत्येकी हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.आलेल्या या बेमौसमी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे.
आडवा पडलेला गव्हाच्या पिकांमुळे यंदा गव्हाचे उत्पन्न कमी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या आधीच गहु पिकांवर आलेला अळीचा प्रादुर्भाव पडल्याने गहू उत्पन्न घटणारच ही भीती निर्माण होती त्यातच निसर्गाच्या अवकाळी पावसाने अचानक दिलेला हा फटका शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला सामोरे जावे लागणार आहे.त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे,अशा पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.तरी शासन या नुकसानीचे पंचनामे करणार किंवा नाही..? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधून आहे.