दंड भरून भागणार जीव गेला तर त्याचा दंड कोण भरणार – सुयोग माने :

भुसावळ – रस्त्यावरील नियमांचे उल्लंघन केले तर दंड भरावा लागतो चलन फाडले जाते हे करता येते परंतु एखाद्याचा जीव गेला तर कोण दंड भरेल अशी माहिती जळगाव आरटीओ विभागातील मा श्री सुयोग माने यांनी दिली . निमित्त होते भुसावळ येथील कला विज्ञान आणि पु . ओं . नाहाटा वाणिज्य महाविद्यालय ‘ रस्ता सप्ताहा सुरक्षा अभियानांतर्गत ‘ कार्यक्रम यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस व्ही पाटील उपस्थित होते .तर त्यांच्या समवेत उपप्राचार्य डॉ बी एच बऱ्हाटे, डॉ ए डी गोस्वामी एन सी सी प्रमुख डॉ स्मिता चौधरी, प्रा दीपक पाटील एन एस एस प्रमुख डॉ आर एस नाडेकर स्वागत व परिचयाचा कार्यक्रम संपल्यानंतर श्री माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यात त्यांनी जगात अपघातामुळे जेवढे मृत्यू होतात त्यापेक्षा जास्त मृत्यू भारतात होतात जगात 11 लाख 90 हजार अपघातामुळे मृत्युमुखी पडले भारतात 2021 मध्ये एक लाख 53 हजार मृत्युमुखी पडले तर 2022 मध्ये एक लाख 68 हजार अपघातामुळे मृत्युमुखी पडले भारताचा आकडा कमी न होता वाढलेला दिसून येतो आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर 2021 मध्ये 12000 व 2022 मध्ये 15000 एवढे अपघातामुळे मृत्युमुखी पडलेले दिसून येतात जळगाव जिल्ह्यात 2021 मध्ये 527 तर 2022 मध्ये 568 पेक्षा जास्त अपघातामुळे मृत्युमुखी पडलेले दिसून येतात या मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये 70 टक्के पेक्षा जास्त टू व्हीलर ची अपघात होते आणि यामध्ये 50% पेक्षा जास्त 15 ते 20 वयोगटातील होते ही आकडेवारी अतिशय चिंता निर्माण करणारी असून यातून आपल्याला मार्ग काढायचा असेल नियमांचे पालन केले पाहिजे उल्लंघन करता कामा नये त्यासाठी प्रत्येकाने हेल्मेट वापरावे , टू व्हीलर वर फक्त दोन व्यक्तींनी प्रवास करावा . मोटार सायकलवर मोबाईलचा वापर करू नका . ओव्हरटेक करताना सुरक्षित अंतर ठेवा . अशी माहिती श्री माने यांनी यावेळी दिली . भारतात आपल्या शिक्षणावर जेवढा खर्च केला जात नाही त्यापेक्षा जास्त खर्च अपघातात मृत्यू पडलेल्यांवर करावा लागतो . हा खर्च जीडीपीच्या जवळ तीन टक्के आहे अशी ही माहिती त्यांनी दिली त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस व्ही पाटील यांनी अध्यक्षीय समारोप केला त्यात त्यांनी बऱ्याच वेळा विद्यार्थी -विद्यार्थिनी रस्त्याने प्रवास करताना नियमाचे पालन होत नसल्याचे दिसते . एकावेळी रस्त्याने दोन – तीन मोटार सायकल समांतर चालवितात तसेच वळणावर इंडेकेटर चा वापर न करता ओव्हरटेक करण्यात येते प्रसंगी कटू प्रसंगाला सामोरे जावे लागते . यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी चा मोठा भरणा असल्याचे दिसते यासाठी सर्वांनी वाहतुकीचे पालन करावे . अशी अपेक्षा यावेळी प्राचार्य डॉ एस व्ही पाटील यांनी व्यक्त केली . दिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन एस एस चे महिला कार्यक्रमाधिकारी डॉ ममताबेन पाटील डॉ व्ही एन महिरे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला एन सी सी यांचे विद्यार्थी उपस्थित होते .