भुसावळ (प्रतिनिधी )-
महाराष्ट्र राज्य ट्वेंटी-२० क्रिकेट संघटनेची ९ वी १५ वर्षाच्या आतील मुलांची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा नंदुरबार येथे ७ ते ९ मार्च २०२० दरम्यान होणार आहे़, सदर स्पर्धेकरिता जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंची निवड रविवार १ मार्च रोजी दुपारी १२ वाजता व्हि. एस नाईक महाविद्यालयच्या मैदानावर बऱ्हाणपूर रोड, रावेर येथे होणार आहे.१ ऑक्टोबर २००५ नंतर जन्मलेल्या खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात स्वतःची बॅट घेऊन निवड चाचणीस उपस्थित राहावे ,अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव वासेफ पटेल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा महासंघटना चे अध्यक्ष प्रा.आ. चंद्रकांत सोनवणे, डॉ. प्रदीप तळवलकर,टी.बी.महाजन, श्रीकांत महाजन, जयेश बीडपन, राहुल कोळी, प्रतिक कुलकर्णी, तारीख अहमद यांनी केले आहे.



