वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना सन्मान मिळण्याचा अधिकार…. ॲड .जास्वंदी भंडारी : वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी कायदेविषयक शिबिर


भुसावळ – भुसावळ वकील संघ व तालुका विधी सेवा समिती भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमानाने वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले
दीनदयालनगर येथील पंडित दीनदयाळ सार्वजनिक समाज हॉल येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वकील संघ महिला प्रतिनिधी ॲड. जास्वंदी भंडारी (पाटील) यांनी भूषविले प्रमुख वक्ते म्हणून रेल्वे विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य ॲड.श्री आय.आय. खान सर उपस्थित होते मंचावर ॲड .कैजार भारमल व ॲड .आरिफ पटेल यांची उपस्थिती होती. Educating the sex workers about their rights vis -a-vis the legality of sex workers. Right and obligation of police and what is permitted/ prohibited under the law as per judgement of Hon’ble Supreme court in Budhadev Karmaskar vs state of West Bengal. या विषयाला अनुसरून महिलांना मार्गदर्शन करण्यात आले
जिथे महिलांचा सन्मान होतो तेथेच देवता वास करतात आणि तेथेच सुख-समृद्धी नांदते. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना त्या हा व्यवसाय करतात म्हणून तुच्छ वागणूक देण्याचा अधिकार कोणालाच नाही संविधानातही तशी तरतूद आहे, त्यांनाही सर्वसामान्य नागरिकांसारखे सर्वच अधिकार , सन्मान मिळावा अशी सूचना व निर्देश सुप्रीम कोर्टाने बुद्धदेव कर्मस्कर वि. स्टेट ऑफ वेस्ट बंगाल या खटल्याच्या वेळी दिले होते. जसे डॉक्टर, इंजिनियर, वकील हे व्यवसाय करणाऱ्यांना सन्मान मिळतो तसाच सन्मान या व्यवसायतील महिलांनाही मिळावा असे काही मार्गदर्शक तत्व सुप्रीम कोर्टाने या खटल्याच्या निकालाच्या वेळी दिले आहेत असे यावेळी प्रमुख वक्ते एडवोकेट आय.आय. खान यांनी सांगितले. एडवोकेट कैजार भारमल यांनी तालुका विधी सेवा समितीचे कार्य व कामकाज कसे चालते या संदर्भात थोडक्यात माहिती दिली व वेश्याव्यवसाय करणाऱ्या माता-भगिनींमुळे समाजातील इतर महिला भगिनी सुरक्षित आहेत असे सांगितले
ॲड .जास्वंदी भंडारी (पाटील) यांनी अध्यक्ष भाषणात जो सन्मान सर्व महिलांना समाजात मिळतो तसाच सन्मान वेश्याव्यवसाय करणार्या महिलांना आहे व तो सर्वांनी त्यांना दिला पाहिजे . वेश्या व्यवसाय फार पुरातन काळापासून चालत असणारा व्यवसाय आहे अगदी पुरातन पुस्तकांमध्ये ही या गोष्टींचा उल्लेख आढळतो म्हणून सुप्रीम कोर्टाने या गोष्टीची दखल घेत काही मार्गदर्शक तत्त्वे या महिलांच्या बाबतीत समाजापुढे ठेवली आहे हा व्यवसाय काही महिला त्यांची इच्छा नसतानाही करत असतात म्हणून ज्या महिलांना हा व्यवसाय सोडायचा आहे अशा महिलांचा पुर्नेवसन करण्यासाठी शासनाकडून मदत केली जाते व ज्या विविध शासकीय योजना महिलांसाठी आहेत त्यांचा लाभ या महिला घेऊ शकतात या महिलांच्या मुलांनाही शिक्षण घेऊन सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे .गंगुबाई काठेवाडी या सिनेमातील काही संवादही उदाहरण म्हणून सांगण्यात आले पोलिसांकडून कशी वागणूक मिळावी याविषयी माहिती यावेळी ॲड .जास्वंदी भंडारी यांनी दिली
शिबिराला उपस्थित सर्व महिलांनी त्यांना मिळत नसणाऱ्या सोयी सुविधा रेशन कार्ड नाही ,संजय गांधी निराधार योजनेचा लाभ नाही अशा विविध अडचणी सांगितल्या सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ कविता ठाकूर ,लिपिक श्री कमलाकर जावळे, लिपिक श्री सतीश पाटील, उमेश ठाकूर ,पो. कॉ. आत्माराम भालेराव, पो. कॉ. नोवेल बॉटली, पो. कॉ. सीमा चिखलकर व गोपनीय शाखेचे श्री संदीप परदेशी यांचे सहकार्य लाभले.