भुसावळ – सध्या संपूर्ण भारतात उष्णतेची लाट सुरू असून, जळगाव जिल्ह्या चे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले असताना, नागरिकांना काहीसा दिलासा देण्यासाठी
दावत-ए-इस्लामी हिंदच्या (गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन) विभागा अंतर्गत
संपूर्ण देश भरात ठिकठिकाणी थंड पाण्याचे स्टॉल पाणपोई लावून पाणी वाटप केले जात आहे ह्याच सेवा भावी उपक्रमा अंतर्गत भुसावळ येथील महंमद अली रोडवय

रझा टॉवरजवळ अशाच थंड पाण्याचे स्टॉल लावण्यात आलं असून उद्घाटन भुसावळ बाजार पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक श्री. गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी दावत-ए-इस्लामीचे राष्ट्रीय सदस्य हाजी सलीम अत्तारी यांनी जीएनआरएफ च्या विभागांबाबत माहिती देतांना सांगितले की, या विभागांतर्गत सामाजिक कार्य केले जातात कोरोना काळातही हजारो कोरोना बाधित मृतदेहांना धार्मिक परंपरेनुसार अंतिम संस्कार व दफन विधी करण्यात आली तसेच गोरगरीब लोकांना रेशन आणि रोख रक्कमे चे ही वाटप करण्यात आली, या सोबतच संपूर्ण देशभरात लाखो रोपांची लागवड करुन वृक्षारोपण व संवर्धन हि करण्यात येत आहे ते पुढे म्हणाले की भविष्यातही संघटने मार्फत असेच सामाजिक हित सेवा व उन्नती चे कार्य सूरु राहील या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हाजी सलीम शेठ
चुडीवाले ,माजी नगरसेवक साबिर शेख ,माजिद भाई बर्तन वाले सय्यद फारुक अली, माजी नगरसेवक आशिक खान इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जुबेर अत्तारी, सईद अत्तारी, अजहर कादरी, फरीद शेख, आणी रफिक रोशन कादरी यांनी परिश्रम घेतले.


