भुसावळ सावदा तालुक्यात 3.3 रे. स्के. भूकंपाचे सौम्य धक्के नागरिकांनी काळजी, घ्यावी भयभीत होवू नये – जिल्हाधिकारी यांचे आवाहन


भुसावळ – भुसावळ तालुक्यात
27 रोजी सकाळी 10.35 वाजता 3.3 रे. स्के. भूकंपाचे सौम्य धक्के बसलेले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यामुळे भुसावळ तालुक्यात कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झालेली नाही. या भुकंपाचे धक्के भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे, साकरी, खडके, किन्ही, शिंदी, कंडारी, फेकरी निंभोरे बु., सतारे, कु-हे प्र.न. गोजोरे, वराडसिम, कन्हाळे बु. तसेच भुसावळ शहरी भागातील समता नगर, मरीमाता पुल, सुरभी नगर प्रोफेसर कॉलनी, संतोषी माता हॉल परिसर, प्रल्हाद नगर, गांधी नगर, मामाजी टॉकीज परिसर, तुकाराम नगर, माऊली नगर, तापी नगर, हनुमान नगर, एकनाथ नगर, मार्केट परिसर, शारदा नगर, व्दारका नगर, गडकरी नगर, खडका रोड परिसर, रामदास 1वाडी परिसर, ग्रीन पार्क या परिसरात भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी , असे आवाहन अमन मित्तल, जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
भुसावळ शहर व परिसरात आज २७ रोजी सकाळी १० .३५ वाजेचे दरम्यान भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. या भुकंपाची तीव्रता 3.3 रेक्टर इतकी होती. हा धक्का सौम्य असला तरीही झालेला आवाज जोरदार असल्याने अनेक भागात नागरिक भयभीत झाले .याबाबत भुसावळ तहसील कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रांताधिकारी रामसिंग सुलाने , तहसीलदार दिपक धीवरे , मुख्याधिकारी संदिप चिद्रवार , उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगीतले की आज 27 रोजी सकाळी 10 . 35 चे दरम्यान अचानक भुसावळ व सावदा परिसरात भूकंप झाल्याचे जाणवले याबाबत नाशिक मेरी येथे नोंद झाली असून हा धक्का 3.3 रेक्टर होता , मात्र या धक्यात कोणत्याही प्रकारची जिवित वा वित्त हानी झालेली नाही .तरी नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नये. भूकंपाचे धक्के जाणवल्यास दक्षता घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
याप्रमाणे घ्यावी घरातील सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. लिफ्टचा वापर करू नका दाराजवळ अथवा प्रवेश दाराजवळ गर्दी करू नका. स्वतः शांत रहा व इतरांना शांत राहण्यास सांगा. जर तुम्ही रस्त्यावर असाल तर पटकन मोकळ्या जागेत जा, घाई गडबड, दंगा करू नका. उंच जुन्या आणि सलग असणाऱ्या इमारतीपासून, भिंती, विजेच्या तारांपासून लांब राहा. भूकंपा दरम्यान जमिनीवर पडा मजबूत टेबलाखाली आसरा घ्या जमीन हलने थांबेपर्यंत त्याला धरून ठेवा जर जवळपास टेबल नसेल तर जमिनीवर झोपा, पाय पार्श्वभागावर घ्या, डोके गुडघ्याजवळ घ्या, डोक्याच्या बाजू कोपरांनी झाकून घ्या, हात माने भोवती घ्या. उपमुख्याधिकारी, नगरपरिषद भुसावळ – 02582-222660 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन प्रांत अधिकारी रामसिंग सुलाने यांनी केले आहे.