भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील नाहाटा महाविद्यालयात ,”लिंगभाव समानता “या विषयावर आयोजित मानव्यविद्या सप्ताहामध्ये चौथे पुष्प गुंफण्यासाठी कणकवली महाविद्यालय कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथील
प्रा. डॉ.सोमनाथ कदम , यांनी “लिंगभाव चळवळीचा इतिहास “या विषयावर व्याख्यान दिले. प्राचीन काळापासून स्त्री ही शोषित होती.मध्ययुगीन काळात रजिया सुलतानाला स्त्री असल्याकारणाने सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. तर आधुनिक काळात ब्रिटिशांचे आगमन झाल्यापासून स्त्री शिक्षण ,स्त्री-स्वातंत्र्य ,सतीबंदी कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा अशा सुधारणा सुरू झाल्या. सुधारकांचे दोन गट होते. अभिजनांचा गट व सत्यशोधक गट. ज्या काळामध्ये ताराबाई शिंदे यांनी स्त्रियांच्या परिस्थितीचा उल्लेख करण्यासाठी ‘स्त्री-पुरुष तुलना ‘ हा ग्रंथ लिहिला. वेगवेगळ्या धर्मात स्री भेद कसा केला जातो हेही त्यांनी आपल्या व्याख्यानात विशद केले.
या समस्येवर उपाय म्हणून लहानपणापासूनच मुला-मुलींमध्ये भेदाभेद करू नये. घरातील कामांचे समसमान वाटप करावे, तसेच याविषयी कायद्यांची अंमलबजावणी करावी, शाळेतील अभ्यासक्रमातही सुधारणा करावी असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक शिरसाट, परिचय डॉ. प्रफुल्ल इंगोले कार्यक्रमाचे समन्वयक, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. पी . ए.अहिरे यांनी भूषविले तर आभार विद्यार्थी शुभम सपकाळे यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर अरुण मांडळकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. रेखा गाजरे, डॉ. स्मिता चौधरी ,डॉ. डी. एम. टेकाडे, डॉ. आर .एस .नाडेकर, डॉ .सचिन राजपूत, प्रा. उज्वला महाजन, डॉ.रूपाली चौधरी, प्रा स्वाती महाजन, प्रा भारती सोनवणे, प्रा. सुषमा तायडे, प्रा. निखिल तायडे, प्रा. आशिष नवघरे इत्यादी उपस्थित होते इत्यादी प्राध्यापक उपस्थित होते.



