भुसावळ – गेल्या २० वर्षांपासून भुसावळ दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पातुन निर्माण होणारी राख हि वेल्हाळे परिसरात पाईपलाईन मार्फत अश बंड मध्ये सोडण्यात येते सदरची पाईपलाईन अति दाबामुळे फुटून व चोक उप काढल्यामुळे वेल्हाळे परिसरात नद्या, नाले व तलवामध्ये मोठ्या प्रमाणावर राखेचे प्रदूषण होऊन जल स्तोस्त्र दूषित झाले आहे. याबाबत सयुंक्त प्रदूषण संघर्ष समिती वेल्हाळे, जाडगाव, मन्यारखेडे, पिंप्री सेकम व आदी जनता मच्छिमार सोसायटी तसेच सदर गावातील नागरिकांमार्फत सन २००९ पासून मोठ्या प्रमाणावर आंदोलन होऊन सुद्धा दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या प्रशासनाने होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लावलेला नाही व शासनाच्या प्रदूषणाबाबत नियम व अटींचे कोणत्याही प्रकारचे पालन किंवा त्यासाठी त्यांच्या पर्यावरण विभाग व स्थापत्य विभागामार्फत कोणत्याही कायमस्वररूपी उपाय योजना केलेल्या नाहीत. भविष्यात ही नियोजन करण्याचा आराखडा तयार नाही. त्यामुळे होऊ घातलेल्या नवीन ६६० प्रकल्पाच्या वेल्हाळा तलाव ते अश बंड क्रमांक ३ पर्यंत राख वाहून नेणाऱ्या पाईपलाईनचे काम बंद करण्याचा इशारा १७ जून २०२२ रोजी शिवसेनेतर्फे देण्यात आलेला होता.
प्रकल्प अधिकाऱ्यांनी केली पाहणी:वारंवार सूचना देऊनही प्रदूषण निर्मूलनासाठी कोणत्याच प्रकारची कार्यवाही दीपनगर प्रशासनाने केली नाही, राखेपासून होणाऱ्या प्रदूषणाकडे डोळेझाक केली जात आहे. वेल्हाळे परिसरातील नैसर्गिक साधन संपत्तीचा नष्ट होत असून, नागरिक आरोग्यविषयक समस्येने त्रस्त आहे म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे तालुका प्रमुख संतोष सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश महाजन, माजी उपजिल्हा संघटक विलास मुळे व शिवसैनिकांनी राख वाहून नेणाऱ्या पाईपलाईन पेडेस्टलचे काम बंद पाडले. काम बंद झाल्याची सूचना मिळताच दीपनगर प्रकल्प मुख्य अभियंता विवेक रोकडे व अधिकाऱ्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यासोबत परिसराची पाहणी केली.

आधी उपाययोजना नंतरच काम नागरिकांना प्रदूषणापासून होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळण्यासाठी कायस्वरूपाच्या उपाय योजना करण्यात याव्यात नंतरच ६६० प्रकल्पाच्या कामाची सुरुवात करावी अन्यथा कोणत्याही प्रकारचे ६६० प्रकल्पाचे काम परिसरात होऊ दिले जाणार नाही असा इशारा संतोष सोनवणे यांनी याप्रसंगी दिला.


