भुसावळ –
भारतीय रेल्वेच्या निवडक 75 स्थानकांपैकी मध्य रेल्वेच्या 4 स्थानकांपैकी भुसावळ विभागाच्या एका स्थानकाची अमृत महोत्सवासाठी निवड करण्यात आली.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, रेल्वे बोर्ड विनय कुमार त्रिपाठी यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले
त्यानंतर त्यांच्याच विभागात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भुसावळ विभागात स्वातंत्र्यसैनिक व स्वातंत्र्यसैनिक यांच्या कुटुंबीयांचे सत्कार करण्यात आला. यात स्वातंत्र सैनिक मनोहर त्रिंबक कुलकर्णी, श्रीमती शांताबाई नामदेव गोडसे, श्रीमती राजूबाई श्रीकिशन झंवर, श्रीमती सत्यभामाबाई मोजाड, श्रीमती मनोरमा श्रीधर रहाणे, श्रीमती सरस्वती बाबुराव मोरे, श्रीमती राधाबाई विठोबा कुंवर,यांचा विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस एस केडिया , अप्पर रेल्वे विभागाचे अधिकारी रुखमैया मीना,हस्ते यांचा सत्कार करण्यात आला.
भुसावळ येथून आलेल्या स्काऊट व गाईड कर्मचाऱ्यांनी पथनाट्य सादर केले. श्रीमती कल्पना कुलकर्णी यांनी गायलेले ‘मेरे वतन के लोगों जरा आंख में भर लो पानी’ हे गीत नाशिक जिल्हयाच्या स्वातंत्र्यसैनिकाच्या छायाचित्रासह, त्यांच्या माहितीचे प्रदर्शनही लावण्यात आले आहे. हे प्रदर्शन 18.7.22 ते 23.7.22 या कालावधीत सुरु आहे. अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी आभार मानले.
नाशिक रेल्वे स्थानक तिरंगा रंगाने रंगविन्यात आले नाशिक स्थानकाची इमारत आकर्षण ठरली असून, त्यावर विविध रंगीत दिवे लावण्यात आले आहेत. सेल्फी पॉइंट बसवण्यात आले आहेत.
या कार्यक्रमास भुसावळ अप्पर रेल्वे विभागाचे अधिकारी रुखमैया मीना, वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक डॉ. शिवराज मानसपुरे, वरिष्ठ विभागीय वाहतूक व्यवस्थापक आर के शर्मा, वरिष्ठ विभागीय अभियंता दक्षिण राहुल अग्रवाल आदी उपस्थित होते .
दरम्यान 23 जुलै रोजी पर्यंत देशभक्ति वरील विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .



