भुसावळ शहरातील आनंद नगर सह सर्वच बस थांब्यावर फलक लावा -शिशिर जावळे : बस आगार व्यवस्थापकांना दिले निवेदन :

भुसावळ – वाहतुक कोंडीचे माहेरघर असलेल्या भुसावळ एसटी महामंडळाच्या बसेस अधिकृत थांबा यावर न थांबता इतरत्र कुठे थांबायला जात आहे त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत आणखीच भर पडत आहे त्यामुळे अधिकृत थांब्यावर बसेस थांबण्यासाठी विनंती फलक लावणे आवश्यक आहे. अधिकृत थांब्यावर ही बस थांबत नसल्याने प्रवाशां समोरील अडचणीत दिवसागणिक वाढल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन सेवा देण्याचे व्रत अंगिकारले आहे मात्र बस चालक आणि वाहन कडून महामंडळाच्या सेवा व्रताला खंडित करण्याचा प्रकार सुरू आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी काही दिवसांपूर्वी हात दाखवा गाडी थांबा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता या नियमाचे पालन न करता परिवहन कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र सध्या चालक वाहकांच्या मनमानीमुळे या उपक्रमाला गेल्या अनेक वर्षांपासून हरताळ फासला जात आहे वाहतूक कोंडीचे कारण पुढे करून अधिकृत थांब्यावर बस थांबत नसल्याने प्रवाशांची हाल होतात भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील आनंद नगर येथे अधिकृत बस थांब्यावर शहरातून बाहेर जाणारे आणि शहरात येणाऱ्या बसेस त्या ठिकाणी थांबणे नियमानुसार आवश्यक आहे. मात्र बस थांबत नसल्याने प्रवाशांना नाईलाजाने खाजगी वाहनांचा सहारा घ्यावा लागतो बसेस अभावी विद्यार्थी, नोकरदारांना, महिला गृहिणी ज्येष्ठ नागरिकांना वेळेवर इच्छित ठिकाणी पोहोचणे कठीण होऊन बसले आहे. या आनंद नगर बस थांब्याच्या आजूबाजूच्या परिसरातून परिसरातून शेकडो लोक दररोज प्रवास करतात. हे सर्वश्रुत आहे. शहरातील आनंदनगर थांब्यावर बस थांबत नसल्याचे अनेकदा तक्रारी करण्यात आलेल्या आहेत मात्र भुसावळ आगार व्यतिरिक्त लांब पल्ल्याच्या बस चालकाना हा बस थांबा माहितीच नसल्याची स्थिती समोर आलेली आहे.त्यामुळे वाहनचालकांना दिसेल अशा ठिकाणी बस थांबा फलक लावणे आवश्यक आहे या प्रकाराबाबत वारंवार झालेल्या तक्रारींकडे आगार प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील अनधिकृत बसथांब्याच्या फलक अनेक ठिकाणी नामशेष झालेले आहेत त्यामुळे प्रवाशांसोबत चालकांनाही या अडचणींचा सामना करावा लागतो. बरेचदा वाहन चालक बऱ्याचदा वाहन चालक आणि प्रवाशांमध्ये या आनंद नगर बस थांबा यावरून वाद विवाद झालेले आहे. नुकत्याच काही दिवसांपासून काही थोड्या प्रमाणात बसेस सुरू झालेल्या असल्यामुळे सदर अधिकृत थांब्यावर पुन्हा बसेस थांबवाव्यात व या कारणांमुळे सतत होणारे प्रवासी आणि वाहनचालक यांच्यातील वाद मिटावेत, विद्यार्थी, गृहिणी,ज्येष्ठ नागरिक,व्यापाऱ्यांचे या दळवळणाच्या बाबात च्या अडचणी सुटाव्यात यासाठी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी पुढाकार घेऊन आनंद नगर जामनेर रोड सह शहरातील सर्वचअनधिकृत बस थांब्यावर विनंतीवरून बस थांबा फलक त्वरित लावण्यात यावा म्हणून नुकतेच भुसावळ आगाराचे व्यवस्थापक प्रमोद चौधरी यांना निवेदन दिलेले आहे. याबाबत त्यांनी परिवहन सचिव व परिवहन मंत्री यांना सुद्धा पत्र पाठवले असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.