भुसावळ (प्रतिनिधी )-
सद्यस्थितीत कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे दिनांक 1 मार्च 2021च्या सरकारी नियमावलीनुसार लॉक डाऊन दिनांक 31 मार्चपर्यंत वाढवलेले आहे. एक सामाजिक संघटना म्हणून आम्ही परिस्थिती समजत आहोत. सद्यस्थितीत इतर सर्व व्यवसाय सुरू असतांना दुसरीकडे मात्र नियमांचे पालन करणारे असे सुशिक्षित बेरोजगार कोचिंग क्लासेस अथवा ट्युशन घेत असल्यास मज्जाव करण्यात येत आहे. यामुळे दुहेरी संकट निर्माण होत आहे. यासाठी आज 8 मार्च रोजी प्रांताधिकारी , मुख्याधिकारी , व डीवायएसपी यांना निवेदन देण्यात आले आहे .
यावेळी सखी श्रावणी महिला मंचच्या अध्यक्षा सौ राजश्री नेवे, यांचेसह हृषीकेश पवार , दिनेश पवार , अनिल साळुंखे, गिरीश शिंदे , युवराज सपकाळे , संदीप कुकरेजा , अर्चना बंड, राहुल पांडव , काझी सर , अग्रवाल सर ,
संगिता लुल्ला , आदीं
उपस्थित होते .
निवेदनात नमूद आहेकी
क्लासेस चालविणाऱ्या लोकांची व त्यांच्या परिवाराची हलाखीची परिस्थिती आहे व दुसरीकडे विद्यार्थ्यांचे विशेष करून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्तमान व भविष्य टांगणीला लागलेले दिसते. आज कोचिंग क्लासेस हा शैक्षणिक क्षेत्रातील एक अविभाज्य घटक व विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देणारे असे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. शहरात बाजार परिसरात, सामाजिक कार्यक्रमात शाळकरी मुले मुली वावरत असतात तेव्हा त्यांच्या स्वास्थ्य विषयक प्रश्न निर्माण होत नाहीत मग शिस्तीत शिक्षण घेताना काय अडचण. इतर जिल्ह्यातील विद्यार्थी योग्य व अखंडित शिक्षण घेत असताना आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान नको.यासाठी वरिष्ठ पातळीवरुन यातून काही मार्ग काढावा अन्यथा क्लासेस चालवणाऱ्यांची व विद्यार्थ्यांची परिस्थिती बिकट असेल. आपण त्यांना सुद्धा इतर व्यवसायाप्रमाणे अटी व शर्तीनुसार व कोरोनाच्या निवाराणा संदर्भातील नियमांचे पालन करत क्लासेस सुरू करू द्यावे, याबद्दल सकारात्मक भूमिका ठेवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून प्रांताधिकारी , मुख्याधिकारी , व डीवायएसपी यांना निवेदन देण्यात आले आहे .



