एक पाऊल आईसाठी ऑनलाइन मॅराथॉन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद


भुसावळ (प्रतिनिधी )-
रोटरी क्लब ताप्ती व्हॅली ने मातृ दिनाचे औचित्य साधून रन फाॅर मा ‘ या ऑनलाइन मॅरेथॉन स्पर्धेचे दिनांक ७ फेब्रुवारी रोजी आयोजन केले होते त्यास संपूर्ण देशातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला जवळपास 750 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता . भुसावळ येथील के के सोनार यांनी सदर स्पर्धेत 42 किलोमीटर प्रवीण वारके, रणजित खंदारे यांनी 21 किलोमीटर स्पर्धा वेळेत पूर्ण केली.
भुसावळ मधील राधाकृष्ण प्रभात फेरी ग्रुप तर्फे सकाळी सहा वाजता राम मंदिर ,आठवडे बाजार ,अष्टभुजा देवी मंदिर, विठ्ठल मंदिर ते पुन्हा राम मंदिर अशी पदयात्रा संपन्न झाली यावेळी प्रभात फेरी ग्रुपचे साधारण ७० सदस्य उपस्थित होते. त्यांनी टाळ शंखाच्या गजरात पदयात्रा संपन्न केली यावेळी रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली चे अध्यक्ष सुधाकर सनसे राधेश्याम लाहोटी, जी आर ठाकुर, समाधान जाधव , किशोर पाचपांडे , गणसिंग पाटील , प्रवीण पाटील उपस्थित होते. वरणगाव ते वरणगाव येथे देखील हायटेक कंप्यूटर टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांनी राजेंद्र परसे सरांसोबत रनिंग स्पर्धा पूर्ण केली.
स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना ई सर्टिफिकेट मेडल व टी-शर्ट कुरियर द्वारे पाठवण्यात येणार आहे
ज्या आईने आपल्याला हे अमूल्य शरीर दिले त्या आईच्या सन्मानासाठी आपण या शरीराची निगा ठेवण्यासाठी एक दिवस तरी चालले अथवा धावले पाहिजे त्यातून आई प्रति कृतज्ञता व्यक्त करावी अशा स्पर्धातून आरोग्य विषयी जनजागृती तसेच आई विषयी कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली चे अध्यक्ष सुधाकर सनसे यांनी केले
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी संजय भटकर , सुनील वानखेडे, योगेश इंगळे , जीवन महाजन , प्रदीप सोनवणे , गोपाल सोनवणे , सुनील श्रीरामे, या रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *