अण्णाभाऊ साठेंचे साहित्य सदैव प्रेरणादायी ठरणार – प्रा.दिनेश पाटील.

भालोद - सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथे मराठी विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील प्रतिभा संपन्न साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.किशोर कोल्हे मराठी विभाग प्रमुख प्रा. जतीन मेढे, प्रा. दिनेश पाटील यांच्यासह उपस्थितांनी  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन केले. महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने प्राचार्य प्रा. किशोर कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सदर कार्यक्रम प्रसंगी मराठी विभागातील प्रा. दिनेश पाटील यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन व कार्य याविषयी सविस्तर माहिती दिली ते म्हणाले. "अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील गोर गरीब, दलित, पीडित ,वंचित आणि विशेषतः कामगार वर्गाच्या जीवनाच्या व्यथा आणि वेदना आपल्या साहित्याच्या माध्यमातून चित्रित केलेल्या आहेत. नक्कीच पुढील पिढ्यांसाठी अण्णाभाऊंचे साहित्य,पोवाडा, लावणी तसेच त्यांचे कार्य मार्गदर्शक व दिशादर्शक ठरणार आहे." सदर कार्यक्रमाला मराठी विभाग प्रमुख प्रा.जतीन मेढे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते