भुसावळ ( प्रतिनिधी )- जागतिक शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने जैन समाजाच्या वतीने दर सोमवारी आयोजित करण्यात येणारा विश्व शांती जप उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. या उपक्रमांतर्गत सोमवार, दि. ६ जुलै रोजी रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत विशेष विश्व शांती जप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम प्रोफेसर कॉलनीतील रामेश्वर नगर येथील रहिवासी तथा प्रसिद्ध समाजसेवक गौतम इंदचंदजी चोरडिया यांच्या निवासस्थानी संपन्न होणार आहे. जागतिक शांतता, सामाजिक सुव्यवस्था आणि सर्वांच्या कल्याणासाठी आयोजित या मंगलमय जप कार्यक्रमात जैन समाजातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जपाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीसंघाच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासंदर्भातील आवाहन संघपती जयंतीलाल सुराणा, जे. बी. कोटेचा, अतुल ताथेड, कांतीलाल चोरडिया आणि विनोद मेहता यांनी केले आहे.


