संजीवनी ब्लड ग्रुप, भुसावळला ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान २०२६’ पुरस्कार


भुसावळ (प्रतिनिधी) – सामाजिक क्षेत्रात रक्तदान व रुग्णसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भुसावळ येथील संजीवनी ब्लड ग्रुपला मुंबईतील मालाड येथे आयोजित विशेष सोहळ्यात अरिहंताणं रक्तसार्थी संस्था, राजस्थान यांच्या वतीने प्रदान करण्यात आलेला प्रतिष्ठेचा ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान २०२६’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार संजीवनी ब्लड ग्रुपच्या सर्व रक्तदाते, स्वयंसेवक आणि सेवाभावी कार्यकर्त्यांनी केलेल्या निःस्वार्थ रक्तदान व रुग्णसेवेच्या कार्याचा गौरव मानला जात आहे. संजीवनी ब्लड ग्रुपने आजपर्यंत हजारो रक्तदात्यांना एकत्र आणून अनेक गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सातत्याने केले आहे.

या सन्मानामुळे संजीवनी ब्लड ग्रुपच्या कार्याला राज्यस्तरीय पातळीवर मान्यता मिळाली असून, भुसावळ शहराच्या सामाजिक क्षेत्रासाठीही ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

या यशाबद्दल संजीवनी ब्लड ग्रुपच्या वतीने सर्व रक्तदाते, हितचिंतक, स्वयंसेवक आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत. तसेच, भविष्यातही समाजहितासाठी रक्तदान आणि रुग्णसेवेचे कार्य अधिक जोमाने व समर्पणाने सुरू ठेवण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला आहे.