भुसावळ (प्रतिनिधी) - मध्य रेल्वेकडून आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी नागपूर–मिरज, नवी अमरावती–पंढरपूर, खामगाव–पंढरपूर आणि भुसावळ–पंढरपूर या मार्गांवर आषाढी एकादशी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. तपशील पुढीलप्रमाणे : 1) नागपूर–मिरज विशेष (4 फेऱ्या) गाडी क्र. 01205 विशेष दिनांक 23.07.2026 आणि 24.07.2026 रोजी नागपूर येथून 08.50 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी मिरज येथे 11.55 वाजता पोहोचेल. गाडी क्र. 01206 विशेष दिनांक 24.07.2026 आणि 25.07.2026 रोजी मिरज येथून 12.55 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी नागपूर येथे 12.25 वाजता पोहोचेल. थांबे : अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसबा डोंगरगाव, जत रोड, ढाळगाव, कवठेमहांकाळ, सलगरे आणि आरग. रचना : 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 10 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी तसेच 2 सामान-सह-गार्ड ब्रेकव्हॅन. 2) नवी अमरावती–पंढरपूर विशेष (4 फेऱ्या) गाडी क्र. 01119 विशेष दिनांक 21.07.2026 आणि 24.07.2026 रोजी नवी अमरावती येथून 14.40 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पंढरपूर येथे 09.10 वाजता पोहोचेल. गाडी क्र. 01120 विशेष दिनांक 22.07.2026 आणि 25.07.2026 रोजी पंढरपूर येथून 19.30 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी नवी अमरावती येथे 12.50 वाजता पोहोचेल. थांबे : बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जळंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी. रचना : 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 10 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी तसेच 2 सामान-सह-गार्ड ब्रेकव्हॅन. 3) खामगाव–पंढरपूर विशेष (4 फेऱ्या) गाडी क्र. 01121 विशेष दिनांक 21.07.2026 आणि 23.07.2026 रोजी खामगाव येथून 11.30 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पंढरपूर येथे 03.30 वाजता पोहोचेल. गाडी क्र. 01122 विशेष दिनांक 22.07.2026 आणि 24.07.2026 रोजी पंढरपूर येथून 05.00 वाजता सुटेल व त्याच दिवशी खामगाव येथे 19.30 वाजता पोहोचेल. थांबे : जळंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी. रचना : 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 10 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी तसेच 2 सामान-सह-गार्ड ब्रेकव्हॅन. 4) भुसावळ–पंढरपूर अनारक्षित विशेष (4 फेऱ्या) गाडी क्र. 01159 विशेष दिनांक 24.07.2026 आणि 25.07.2026 रोजी भुसावळ येथून 13.30 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पंढरपूर येथे 03.30 वाजता पोहोचेल. गाडी क्र. 01160 विशेष दिनांक 25.07.2026 आणि 26.07.2026 रोजी पंढरपूर येथून 22.30 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी भुसावळ येथे 13.00 वाजता पोहोचेल. थांबे : जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी. रचना : 16 सामान्य द्वितीय श्रेणी डबे तसेच 2 सामान-सह-गार्ड ब्रेकव्हॅन. प्रवाशांनी टिकट बुकिंगसाठी RailOne अॅपचा वापर करावा . सविस्तर वेळापत्रक व थांब्यांची माहिती जाणून घेण्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी किंवा NTES अॅप डाउनलोड करावे.



