भुसावळ (प्रतिनिधी ) ,-: शहरातील काझी प्लॉट परिसरात शुक्रवारी रात्री सुमारे दहा वाजेच्या सुमारास एका राहत्या घराला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले बघता बघता तीन ते चार घर आगीत भस्मसाद झाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


