जळगाव जिल्ह्यात मार्च अखेरीस पुन्हा एकदा हवामानात बदल पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात अवकाळी पावसाचा पुन्हा इशारा दिला आहे मात्र यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यात जिल्ह्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो. ३० मार्च ते २ एप्रिल या काळात येलो अर्लट दिला असून ढगाळ वातावरण कायम राहणार असून, जिल्ह्यात पावसाची हजेरी लागणार आहे
आधीच १८ आणि १९ मार्चला झालेल्या पावसामुळे सुमारे ७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीतून शेतकरी सावरत असतानाच नव्या पावसाच्या अंदाजाने चिंता अधिकच वाढली आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज असून पाऊस झाल्यास शेतात उभी असलेली मका आणि दादरसह अनेक पिके धोक्यात येऊ शकतात. विशेषतः वादळी वारा सुटल्यास जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या केळीच्या बागांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे या पावसामुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा काहीसा खाली येईल. गेल्या आठवड्यात अवकाळी सावटामुळे तापमानात घट झाली होती. मात्र या आठवड्यात तापमानाचा पारा वाढल्याने उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या असून यामुळे जळगावकर हैराण उकाड्याने हैराण झाला आहे. परंतु आता पुढील संपूर्ण आठवडाभर अवकाळीचे सावट असणार असल्याने तापमानात घट होण्याची शक्यता आहे. उन्हाचा कडाका कमी असला तरी दमट हवामानामुळे नागरिक हैराण होण्याची शक्यता आहे.
आगामी पाच दिवस कसे राहणार जिल्ह्यातील वातावरण?
दिनांक, तापमान आणि वातावरणाची स्थिती,
२९ मार्च : ३६ अंश, कोरडे हवामान
३० मार्च : ६ अंश, सकाळी कोरडे, दुपारनंतर ढगाळ वातावरण व काही अंशी पाऊस
३१ मार्च : ३५ अंश, दिवसभर ढगाळ वातावरण दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस
१ एप्रिल : ३५ अंश, वादळी वारे व ढगांच्या गडगडाटासह पाऊस


