भुसावळ (प्रतिनिधी )
देवगिरी कल्याण आश्रम, भुसावळ जिल्हा यांच्या वतीने आयोजित महिला अभ्यासवर्ग आज २८ फेब्रुवारी शनिवार रोजी संघ कार्यालय प्रेरणा हॉल येथे उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात महिला प्रांत प्रमुख सौ. मीना वसावे, जिल्हा सह महिला प्रमुख चित्रा आचार्य ,आणि जनजाती समाज महिला सौ. सरला बारेला यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

अभ्यासवर्गाच्या प्रथम सत्राच्या प्रारंभी ॲड. जयश्री देशमुख यांनी गीत सादर करून वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महिला प्रांतप्रमुख सौ. मीनाताई वसावे, महिला सहप्रांत प्रमुख चित्रा पुराणिक, जनजाती समाज महिला सौ. सरला बारेला, सविता आशिष जाधव (राजगौंड), सौ. वाली बारेला, प्रांत सचिव काशिनाथ बारेला सर, जिल्हा प्रमुख ॲड. जास्वंदी भंडारी, तसेचजिल्हा सह महिला प्रमुख ॲड. चित्रा आचार्य आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हा प्रमुख ॲड. जास्वंदी भंडारी यांनी लव्ह जिहाद या विषयावर युवती व महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन करताना सामाजिक समस्यांविषयी जागरूक राहण्याचे व प्रभावी उपाययोजना राबवण्याचे आवाहन केले. तर जिल्हा सह महिला प्रमुख ॲड. चित्रा आचार्य यांनी महिलांनी स्वरक्षणासाठी लाठी-काठी प्रशिक्षण घेणे, अन्यायाविरोधात आवाज उठवणे आणि आत्मसंरक्षणाची क्षमता वाढवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. जनजाती समाजातील महिलांनी दिलेल्या लढ्यांची उदाहरणे देत त्यांनी ‘नारीशक्ती’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रांत महिला प्रमुख सौ. मीना वसावे यांनी ‘पंचपरिवर्तन’ या संकल्पनेवर सखोल माहिती देत सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी भावना, कौटुंबिक ज्ञानप्रबोधन व नागरी कर्तव्य-जागृती या पाच बिंदूंवर कार्य करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. जनजाती समाजाच्या पराक्रमी योद्धा राणी दुर्गावती यांच्या जीवनकार्याची माहिती ॲड. मंजुषा कुलकर्णी यांनी प्रभावीपणे मांडली. महिला संघटन व महिला कार्याची आवश्यकता या विषयावर चित्रा पुराणिक यांनी उदाहरणांसह महिलांचे नेतृत्व व कार्य मांडले. ,

प्रांत सचिव काशिनाथ बारेला सर यांनी देवगिरी कल्याण आश्रमाचा परिचय व विविध आयामांची सविस्तर माहिती दिली. समारोप प्रसंगी खेलकूद आयाम प्रमुख प्रांत श्री. मधुकर वाणी सर यांनी आश्रमाच्या कार्यपद्धतीवर प्रकाशझोत टाकत खेलकूद आयामाचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी जिल्हा प्रमुख डॉ निलेश भिरुड उपस्थित होते

दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला जिल्हा प्रमुख ॲड. जास्वंदी भंडारी यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार उज्वला बागुल यांनी केलेकार्यक्रमाचा समारोप शांतिमंत्राने करण्यात आला
कार्यक्रमास सुमारे 60 ते 65 महिला भगिनी उपस्थित होत्या. . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महिला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, सदस्या सह वीरसिंग बारेला , यांचे विशेष सहकार्य लाभले. दात्यांच्या सहकार्याने वर्ग झाला परिसरातील जनजाती समाजातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमास यशस्वी केले. भुसावळ जिल्ह्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


