भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ नजीक पाडळसे ता. यावल, जि. जळगाव येथे पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांच्या पावन उपस्थितीत भव्य श्री शिवमहापुराण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा आध्यात्मिक महोत्सव दिनांक १० मार्च ते १६ मार्च २०२६ दरम्यान पार पडणार असून, समारोप दिनांक १६ मार्च २०२६ रोजी होणार आहे यांसाठी आयोजन समिती युद्धपातळीवर कार्यरत असून कथेची व भाविकांच्या व्यवस्थेची जय्यत. तयारी सुरू आहे भुसावळ येथे होणाऱ्या शिवमहापुराण कथेस सुमारे १०लाख भाविकांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक तथा श्री शिवमहापुराण कथा समिती, पाडळसे २०२६ अध्यक्ष विजय रतन भोई यांनी आज १ मार्च रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी त्यांनी सांगितले की , आयोजन समितीच्या मार्गदर्शनाखाली सर्व नियोजन पूर्ण करण्यात येत असून याकरीता २० नियोजन समित्या तयार करण्यात आल्या आहेत तर सुमारे २५०० हजार. स्वयंसेवक व सेवेकरी परिस्थितीवर लक्ष ठेवून असतील . तसेच सुमारे १३०० पोलिस कर्मचारी आराखडा तयार करण्यात आला आहे.

भव्य कलश यात्रा ..
..दि. ०९/०३/२०२६ (सोमवार) रोजी सकाळी भक्ती आणि शक्तीचे कलश यात्रा काढण्यात येवून भव्य प्रदर्शनाने वातावरण निर्मिती करण्यात येईल ही कलश यात्रा तापी नदी उत्तर तीरापासून कथा स्थळापर्यंत काढण्यात येणार आहे. सोमवार रोजी दुपारी सुमारे ४ वाजता गुरुदेवांचे भुसावळ येथे आगमन होणार असून भुसावळ शहरातील तापी नगर भागात के नारखेडे शाळेसमोर रतन धोंडू भोई यांचे निवासस्थानी गुरुदेव पंडित प्रदीप मिश्रा यांचा निवासस्थान असेल तर दि. १०/०३/२०२६ ते १५/०३/ २०२६ रोजी दररोज दुपारी २ ते ५ श्री शिवमहापुराण कथा होणार आहे दि. १६/०३/२०२६ रोजी कथा सकाळी सकाळी ८ वाजता होणार असून पंडितजी ११ वाजेला कथेचा समारोप होईल व दुपारी ३ वा. सिहोरकडे प्रस्थान होणार आहे.
कथा स्थळावर अत्यंत चोख अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी परिसरातील २०० एकर शेत जमिनीवर १३२x६०० चे एक व १०० x ४६० चे दोन असे एकूण तीन जर्मन हॅंगर अद्यावत डोम , गुरुदेवांसाठी स्वतंत्र भव्य स्टेज , संगीतकार व आस्था चॅनल लाईव्ह प्रसारणासाठी स्वतंत्र मंच , मान्यवर, संत-महंत व पासधारकांसाठी स्वतंत्र व्यवस्था ,१५x१५ च्या सुमारे २००० सिलिंगची अधिक व्यवस्था भाविकांसाठी , कुलर, पंखे व प्रखर प्रकाश व्यवस्था, हॉटेल कोळीवाडाच्या बाजूने फक्त गुरुदेव व त्यांचे सहकारी व व्हीआयपी ये जा करतील. तसेच भुसावळ जळगाव यावल कडील भाविक हॉटेल सहारा समोरून प्रवेशद्वाराने व सावदा रावेर मुक्ताईनगर याकडील भावी अकलूज गावाकडील रस्त्याने कथास्थळी येतील तर भोजन व्यवस्था हॉटेल सहारा च्या समोरील रस्त्याने प्रवेश , व पुढील मार्गाने बाहेर पडतील तर स्वयंपाक घर व गोदाम मुख्य रस्त्याला त्याच्यापुढे वितरण व्यवस्था टेबल व भाविकांना प्रसाद वाटप व मंडपात बसून जेवण पुन्हा लागल्यास जागेवर पदार्थ पुरवण्यात येतील यामुळे प्लेट ठेवणे पाणी पिणे व दुसऱ्या मार्गाने बाहेर निघणे सोपे होईल कथास्थळी पर्यावरणाकडे जास्त भर देण्यात आला असून प्लास्टिक वापर टाळण्यात आलेला आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जागोजागी एक हजार लिटरच्या टाक्या ठेवून मोठ्या करणे स्वयंपाकासाठी व पिण्यासाठी मिनरल पाण्याची व सुमारे ४० टँकरची व्यवस्था राहील स्वच्छतेसाठी ठीक ठिकाणी घंटागाडी व ट्रॅक्टरची सोय केली असून याकडे कचरा व्यवस्थापन समिती जातीने लक्ष देणार आहे भाविकांच्या अंघोळीसाठी अकलूज शिवारामध्ये महिला करिता वेगळे व पुरुषांकरिता वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे बॉक्स टॉयलेटच्या सोय सुद्धा करण्यात आली आहे पोलीस विभागाच्या निर्देशाप्रमाणे एकूण पाच ठिकाणी ॲम्बुलन्स अग्निशामक दल तैनात राहणार आहे तसेच एकूण पाच ठिकाणी ॲम्बुलन्स व अग्निशामक दल पथक तैनात राहतील तसेच एचपी पेट्रोल पंपा समोर कथेच्या प्रवेशद्वारा जवळ सिविल हॉस्पिटल गोदावरी मेडिकल कॉलेज व नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आदी मेडिकल टीम कथास्थळी राहतील. कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून पोलीस नियंत्रण कक्ष तसेच सीसीटीव्ही कक्ष यांची व्यवस्था करण्यात आली आहे पेट्रोल पंपाच्या समोरील बाजूस रस्त्याच्या पलीकडे स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे.
भुसावळ करीता गुरूदेव व व्हीआयपी प्रवेश आणि पार्किंग शिवकृपा एच पी पेट्रोल पंप शेजारील रस्त्याने केली आहे तर दुचाकी वाहने संत आसाराम बापू आश्रम जवळ, चारचाकी व अन्य वाहने यावल रोड वरील पाईप फॅक्टरी शेजारी व समोर, बस पार्किंग यावल फैजपूर y पॉईंट वर , यावल चोपडा शिरपूर कडील पार्किंग .. अंजाले पिळोदे रस्त्यावर आणि समृद्धी पार्क येथे, तर सावदा फैजपूर जवळील पार्किंग नायरा पेट्रोल पंप पाडळसे जवळील रस्त्याचे दोन्ही बाजूस, सावदा फैजपूर एसटी बस पार्किंग भोरटेक, फाटा जवळ , वरणगाव मुक्ताईनगर कडील पार्किंग हतनूर धरण दुसखेडा मार्गे कठोरा फाटा जवळ, जळगाव कडून येणारी वाहने शेळगाव बँरेज येथील खालचा व वरचा पूल येथे करण्यात आली आहे. तापी नदी पुलावर सुरक्षा जाळी व तात्पुरते दुभाजक तात्पुरता घाट बांधकाम , तापी नदीवर एन डी आर एफ च्या टीमचे व्यवस्था , रस्त्याचे डागडुजी , शेळगाव बरेज वरील पूल सुरू करून द्यावा जेणेकरून जळगावची गर्दी भुसावळला येणार नाही व खालील पूल सुरू करणे जेणेकरून तापी पुलावर चा भार कमी होईल अशी ही मागणी केली आहे
तापी नदी पुलावर तात्पुरता घाट बांधणे, गावात स्वच्छतागृह दिवा बत्ती पाण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे कथा स्थळी अग्निशामक दल घंटागाडी पाणी टँकर पूर्ण मोबाईल टॉयलेट पुरविणे यासाठी पालखीला सूचना केले आहेअतिरिक्त एस.टी. बस सेवा , रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्यांची सोय ,वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत एमएसईबी ला पत्र दिले आहे.सार्वजनिक बांधकाम, नगरपालिका, आरटीओ, जिल्हा रुग्णालय आदी विभागांना लेखी पत्रव्यवहार करून मागणी केली आहे. यासर्व मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी , प्रांताधिकारी यांच्यासोबत विशेष बैठक झाली असून प्रशासनाने सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. संबंधित विभागांना सुद्धा सूचना देत आहे. असेही आयोजकांनी यावेळी सांगितले.सदर कथा सोहळ्यासाठी जिल्हाभरातून तसेच राज्यभरातून लाखो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कथेत आलेल्या भाविकांसाठी अन्नदान करण्यास दात्यांनी सहकार्य करावे असेआवाहन करून जास्तीत जास्त भाविकांनी कथा श्रवणाचा लाभ घ्यावा तसेच सर्व भाविकांनी समितीच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, विशेष सूचना…..
आपल्या मौल्यवान वस्तु आणू नये, किमती वस्तु, दागदागीने,मोबाईल, आपल्या जबाबदारीने सांभाळावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस अध्यक्ष विजय रतन भोई , देवेंद्र अग्रवाल, राजेश अग्रवाल, सुरेश वाघ, डॉ चेतन चौधरी, संदीप प्रभाकर सोनवणे, सचिन सपकाळे, अजय पाटील राहुल भोई दशरथ भोई चंदन तायडे वाडीले आधी समिती सदस्य उपस्थित होतेसुरत येथील लड्डू गोपाळ गोशाळा, स्वामी हरजीवन दास महाराज, स्वामी जनार्दन महाराज, पवनदास महाराज , नयन प्रसाद महाराज यांचे मार्गदर्शन तसेच र्केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे, ना गुलाबराव पाटील, आमदार अमोल जावळे यांचेसह अन्य राजकीय नेते पदाधिकारी व प्रशासनाचे सहकार्य लाभत आहे.


