अमली पदार्थांच्या सेवनाची कोठलीही सुरक्षित पातळी नसते- प्रा. डॉ दयाघन राणे

भुसावळ (प्रतिनिधी ) –
श्री अभिषेक भास्कर पाटील माध्यमिक विद्यालय आणि श्री हरी लक्ष्मण पाटील कनिष्ठ महाविद्यालय खिर्डी बु. तालुका रावेर येथे नुकताच व्यसनमुक्ती जनजागृती अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ. किर्ती महाजन , तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेचे नाशिक विभागीय संघटक प्रमुख प्रा. डॉ दयाघन राणे उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ. किर्ती महाजन यांनी सांगितले की जवळ जवळ सर्वच मुलांना मोबाईल फोन आणि सोशल मिडिया चे व्यसन लागलेले असून विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे लहान वय लक्षात घेता सोशल मीडियाचा वापर तसेच मोबाईल फोन चा वापर जास्त वेळ केल्यास मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून लहान मुलांनी मोबाईल फोनचा वापर करण्याऐवजी पुस्तके वाचणे किंवा मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे.
मार्गदर्शन सत्रादरम्यान प्रा डॉ दयाघन राणे यांनी व्यसनाची व्याख्या आणि व्यसने लागण्याची करणे सांगून कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले. व्यसन लागण्यासाठी वापरात येणारे विविध प्रकारचे अमली पदार्थ आणि त्यांचा शरीरावर होणारा परिणामही स्पष्ट केला. दारू, तंबाखू, गुटखा आणि इतर अमली पदार्थांच्या सेवनाने शरीरावर होणाऱ्या परिणामांसोबतच कुटुंब आणि समाजावर होणारे परिणामही विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच मोबाईल फोनच्या वापराचे व्यसन अत्यंत घातक असून इलेक्ट्रोस्मॉग हा आरोग्यासाठी अत्यंत घातक असतो हे विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. तसेच मोबाईल फोन च्या रेडिएशनच्या दुष्परिणामापासून दूर राहण्यासाठी अँटी रेडिएशन चिप घरगुती वापरातील गोष्टींपासून काही बनवावी आणि ती कशी कार्य करते हे ही स्पष्ट केले.
या मार्गदर्शन सत्रादरम्यान नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या व्यसनमुक्ती विषयाची माहिती आणि अनेक प्रेरक वाक्ये असलेल्या पोस्टर्स तसेच फ्लेक्स चे प्रदर्शन ही विद्यार्थी विद्यार्थिनी साठी आयोजित करण्यात आले. त्यावरील माहिती वाचून विद्यार्थ्यांनी आपण पुढील जीवनात कधीही अमली पदार्थ सेवन करणार नाही. आहे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजनाबद्दल नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे चिटणीस चंद्रकांत चौधरी यांनी विद्यार्थ्यांना जी त्यांच्या व्यसनमुक्त निरामय भावी जीवनासाठी शुभेछ्या दिल्या आहेत.
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्रा डॉ दयाघन राणे यांचे स्वागत कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य सौ. किर्ती महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री एच पी पाटील सर यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी इयत्ता पाचवी ते बारावीच्या वर्गातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते.