पीएम सूर्यघर योजनेत कर्ज प्रकरणात SBI भुसावळ शाखेकडून इन्शुरन्स सक्ती – शिशिर जावळे : पंतप्रधानांकडे तक्रार करणार ;

भुसावळ (प्रतिनिधी ) :
केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी ‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना’ देशभरात राबवली जात आहे. सामान्य नागरिकांना या योजनेतून कर्जसहाय्य उपलब्ध होत आहे. मात्र, भुसावळ येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मुख्य शाखेकडून कर्ज प्रक्रियेत इन्शुरन्सची सक्ती केली जात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव . शिशिर दिनकर जावळे यांनी केला आहे.

“सरकार लोकहितासाठी सौर ऊर्जा योजना राबवत आहे. मात्र, SBI भुसावळ मुख्य शाखा कर्ज मंजूर करताना ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने इन्शुरन्स घेण्यास भाग पाडत आहे. ही बाब कर्जदारांच्या हक्कांवर गदा आणणारी आहे. असून जावळे याविरोधात लवकरच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्याकडे लेखी तक्रार सादर करणार आहे.”

या प्रकारामुळे लाभार्थी वर्गामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधानांच्या नावावर चालणाऱ्या योजनेत बँक अधिकाऱ्यांकडून अशा सक्तीमुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.MNRE (नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अशा कोणत्याही विम्याची सक्ती नाही) RBI व IRDAI च्या नियमानुसार बँकेने ग्राहकांना जबरदस्तीने त्यांचा विमा घेण्यास भाग पाडू नये विमा घेणे हा ग्राहकांचा स्वेच्छेचा भाग असून त्यांना आपण जबरदस्ती करू शकत नाही असे मार्गदर्शक तत्व सूचना नियम असताना देखील स्टेट बँक भुसावळ मुख्य शाखा सह विविध शाखांमध्ये अशा पद्धतीने सौर ऊर्जा लावणाऱ्यांवर ग्राहकांकडून आज पावतो त्यांची इच्छा नसताना देखील भुसावळ स्टेट बँकेच्या मुख्य तसेच इतर काही शाखांमधून जबरदस्तीने त्यांना सदर बॅंकेने विविध कमी जास्त प्रीमियम असलेले विमा घेण्यास भाग पाडलेले आहेत त्याची सुद्धा उच्चस्तरीय चौकशी व्हावी
तसेच नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे, केंद्र सरकारने आणि बँक व्यवस्थापनाने तत्काळ लक्ष घालून अन्यायकारक सक्ती त्वरित थांबवावी याकरिता लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याबाबत तक्रार करणार असल्याची माहिती प्रदेश सचिव भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र जावळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविलेली आहे