भुसावळ (प्रतिनिधी ) – 28 जुलै हा दिवस जागतिक निसर्ग संवर्धन दिवस म्हणून पाळला जातो. मानवाने आपल्या लालसेपोटी ज्या निसर्गाने आपणास सर्व काही दिले त्या निसर्गाचे संवर्धन करण्याऐवजी त्याला पोखरण्याचे काम केले . त्यामुळे पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात आले आहे आपणास अनेक संकटांना जसे ग्लोबल वॉर्मिंग , विविध प्रकारचे आजार, चक्रीवादळ, ढगफुटी अशा अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. पुढील पिढी काय आताची पिढी धोक्यात आली आहे. या पृथ्वीवरील निसर्गनिर्मित वस्तूंचे होत असलेले शोषण रोखण्यासाठी व त्यांचे संवर्धन करण्यासाठी जैवविविधता टिकण्याकरिता जनजागृती करण्याकरिता हा दिवस साजरा केला जातो. एकमेकांवर अवलंबून असलेल्या प्रजाती नामशेष होत असल्यामुळे त्या पृथ्वी वाचवण्याकरिता पृथ्वीवरील विविध प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती, खनिजे, जंगल, पाणी पशुपक्षी कीटक व झाडे मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहे. सुरेंद्रसिंग पाटील पर्यावरण जागर प्रतिष्ठान पर्यावरणाचा समतोल राहिलेला नाहीआठवण यावी यासाठी संवर्धन दिन साजरा केला जातो.

पृथ्वीवर निसर्गनिर्मित सर्व वस्तूंचे जतन करून निरोगी आयुष्यासाठी शुद्ध व स्वच्छ वातावरणासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे महत्त्वाचा आहे त्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळूया, सरकारी वाहने वापरून वायू प्रदर्शन कमी करूया पाणी काटकसरीने वापरूया, सार्वजनिक ठिकाणी कमी आवाज ठेवूया ध्वनी प्रदूषण टाळूया निसर्गनिर्मित सजीवांना आवश्यक ती झाडे लावूया त्याचे संगोपन संवर्धन करूया, निसर्गनिर्मित सर्व वस्तूंचे रक्षण करूया पर्यावरणाचा समतोल राखूया, पृथ्वीची रक्षा करू या पृथ्वीचे अस्तित्व टिकण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचे रक्षण करून संवर्धन करणाऱ्या तसेच झाडे लावून त्यांच्या संगोपन व संवर्धन करणाऱ्यांना वंदन करून जागतिक संवर्धन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत संदेश दिला आहे


