भुसावळमध्ये भव्य तिरंगा रॅलीने कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा ; सर्वत्र देशभक्तीचा जल्लोष ;५० फुटाचा तिरंगा ठरले रॅलीचे आकर्षण;

भुसावळ (२६ जुलै प्रतिनिधी ) – शहरात भारत माता की जय’,‘वंदे मातरम्’,‘जय हिंदच्या घोषणा देत शहरात शनिवार दिनांक ३६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस निमित्त बियाणी एज्युकेशन ग्रुपतर्फे भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली . ५० फुटाचा भव्य विशाल असा तिरंगा या रॅलीचे आकर्षण ठरले .

शहरातील पांडुरंग टॉकीज चौक भागातील एचडीएफसी बबँके नजिक निघालेल्या या रॅलीत बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सचिव डॉ.संगीता बियाणी, पियूष बियाणी, बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य,शिक्षक तसेच प्रमुख पाहूणे म्हणून प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे,महेंद्रसिंग ठाकूर,भारती ठाकूर,डॉ छाया फालक,कविता ठाकूर,राजीव पारिख,प्रविन भराडीया आदी सह शहरातील प्रतिष्ठित नागरिक,नगरसेवक, विद्यार्थी,शिक्षक व पालकवर्ग यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शहीद राकेश शिंदे यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना मानवंदना देण्यात आली.
या तिरंगा रॅलीत ‘भारत माता की जय’,‘वंदे मातरम्’,‘जय हिंद’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीमय झाला होता. बियाणी सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी ५० फुटाचा लांब विशाल तिरंगा घेऊन शिस्तबद्ध रॅली काढत नागरिकांमध्ये देशप्रेमाचे संदेश पोहोचवला. रॅलीत बियाणी मिलीटरी स्कुल चे इयत्ता ८ वी ते १० वीचे ३०० विद्यार्थी तसेच शिक्षक उपस्थित होते.
शाळेचे प्राचार्य डी एम पाटील यांनी आभार मानले.

फोटो कॅप्शन – भुसावळ येथे बियाणी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी काढलेली तिरंगा रॅली.