गारबर्डी धरण ९९ टक्के भरले, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ;

. रावेर. – सातपुडा पर्वतातील जीवन वाहिनी नदी म्हणून ओळखली जाणारी आणि रावेर यावल चोपडा या तालुक्याला सुजलाम सुफलाम करणारे सुकी नदी आणि तिचे पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाला असून पावसामुळे गारबर्डी धरणात ९९.८० % पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे.

त्यामुळे रावेर तालुक्यातील गारबर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असाच पाऊस रात्रभर सुरू झाल्यास कुठल्याही क्षणी सुकी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येईल असे धरण क्षेत्रातून कळवण्यात आलेले आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोणीही नदीपात्रात जाऊ नये अथवा गुरे ढोरे नदीपात्रा सोडू नये असे जळगाव पाटबंधारे विभाग यांच्यामार्फत कळविण्यात आलेले आहे. आजच्या पावसामुळे परिसरातील शेतकरी वर्ग आनंदित झाला असून सुखी नदीला पाणी आल्यास नक्कीच रावेर तालुक्यातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता शेतकरी वर्गामध्ये वर्तवण्यात येत आहे