भुसावळ (प्रतिनिधी ) – *श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघ भुसावळ.यांच्या वतीने मा. राजश्री देशमुख यांचे *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्ष जन्मोत्सव निमित्त व्याख्यान झाले*.
सभेची सुरुवात रामनाम जपाने मा. संजीवनी क्षीरसागर यांनी केली. विश्वप्रार्थना व प. पू. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन वाचन . अशोकजी निकम यांनी केले.
प्रमुख पाहुण्यांचा सत्कार अध्यक्षा रागिणी पुराणिक
आणि सचिव अलकाताई ढाके यांनी गुच्छ आणि भेटवस्तू देऊन केला. पाहुण्यांच्या परिचय रत्नाकर क्षीरसागर यांनी करून दिला.
मा.राजश्रीताई देशमुख यांनी ओघवत्या आणि सोप्या भाषेत अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र सांगितले. त्यांनी आपल्या कार्यकाळात बारा ज्योतिर्लिंगांसह भारत वर्षातील अनेक प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार केला. धर्मशाळा, तसेच नद्यांवर घाट बांधून विविध तीर्थक्षेत्रांवर मंदिरे, मठ, घाट, विहीरी, अनाथ आश्रम, वाचनालये, शाळा, दवाखाने निर्माण करून धर्म व संस्कृतीचे जतन व संवर्धन केलेधर्म आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन केले. सुप्रसिद्ध काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. चारही धर्मपिठांच्या शंकराचार्य समवेत निर्णयानुसार अहिल्यादेवी यांना पुण्यश्लोक या सन्मानाने गौरवण्याचा निर्णय घेतला. त्या ज्ञानाची सरिता, भोगपरांगमुख पण कर्तव्याचा संन्यास न घेतलेल्या अशा होत्या त्यांचा जन्म अहमदनगर मधील चौंडी या गावी माणकोजी शिंदे आणि सुशीला बाई यांच्या पोटी झाला त्या काळात माणकोजी शिंदेंनी आपल्या मुलीला शिक्षणाची गोडी लावली, अध्यात्माचे संस्कार केले, त्या विलक्षण प्रतिभेच्या धनी होत्या. त्यांच्यामध्ये दया, परोपकार, प्रेम, सेवाभाव या भावना बालपणीच उपजतच होत्या. मल्हाररावांचे सुपुत्र खंडेराव होळकर यांच्यासोबत त्यांचा आठव्या वर्षी विवाह झाला. सासरे मल्हारराव होळकर यांची मुत्सद्देगिरी आणि सासुबाई गौतमा बाई यांनी दिलेले सर्वसमावेशक शिक्षण, मुत्सद्देगिरी आणि प्रशासकाचा वारसा सुनेला दिला म्हणून 18 –20 वर्षाच्या अहिल्यादेवी कुशल प्रशासक होऊ शकल्या. त्या रोज फडणविशित जात. हिशोब बघत, वसूल जमा बघत,
त्यासाठी माणसे पाठवत, न्याय निवाडे करत, सरदारांना पत्रे पाठवत, अवजारे तयार करत, खाजगी उत्पन्न आणि सरकारी उत्पन्न रोखठोकपणे वेगळे ठेवत, खातेनिहाय पैशांचे वाटप करत, गोळाबारूत, बाणभाते, ढाली, तलवारी सज्ज राखत, आणि सासऱ्यांच्या पत्राबर हुकूम सर्व रवाना करत असत. हे कार्य नित्य नियमाने करत असत. त्यासाठी त्या दिवसभर सद रेवर बसून काम करत असत सुकाळासोबत दुष्काळा सतत काही काम सुरू राहिले पाहिजे या त्यांच्या कटाक्षामुळे कारागिरांना, मजुरांना भरपूर रोजगार मिळत असे. शिल्पकला वास्तुकला या कलाही भरभराटीस आल्या राज्यातील सांस्कृतिक आणि सामाजिक अभिसरणासाठी विद्वान, पंडित, शास्त्री यांचा मानसन्मान करीत असत.
त्यांचे जीवन आणि व्यक्तिमत्व हे त्याग आणि तपश्चर्येतून घडले होते. ‘मी जे करते आहे ते सत्ता आणि सामर्थ्याच्या बळावर, त्याचा मला परमेश्वरापुढे जाब द्यावा लागेल या भावनेने त्यांनी राजकारण, समाजकारण यातून मानव जातीची, पशुपक्षी, जीवजंतू यांची सेवा केली सरकारी कामकाजासाठी त्या सूर्यास्तापर्यंत सदरेवर बसत असत.
महेश्वर येथील वाड्यात त्यांचे साधे पण ऐश्वर्य संपन्न देवघर आहे. स्वराज्य निर्मितीच्या या यज्ञात सदैव शेतकरी हिताला प्राधान्य दिले. प्रजेला सुखी आणि समृद्ध करण्यासाठी पंचायत राज व्यवस्था निर्माण केली जिल्हा आणि तालुका असे स्वतंत्र विभाग निर्माण केले खेड्यात ग्रामपंचायती निर्माण केली. शेतकऱ्यांना जाचक करातून मुक्त केले. त्यांच्या अडचणी व समस्या जलद गतीने सोडवल्या. दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करून आवश्यक ती मदत पुरवली जात असे. गोपालनासाठी शेतकऱ्यांना राजवाड्यावरून गाई देण्याची पद्धत सुरू केली. शेतात 12 फळझाडे लावून त्यातील सात झाडे शेतकऱ्यांच्या मालकीची व पाच झाडे सरकारच्या मालकीची असत. यापैकी पाच सरकारच्या मालकीच्या झाडांची फळे ही गोरगरीब जनतेला वाटली जात यावरूनच पुढे सातबाराचा उतारा हे नाव रूढ झाले. त्यांनी स्वतः सोबतच जनतेलाही आत्मनिर्भर आणि सक्षम करण्याकामी विशेष पावले उचलली. त्यांनी विणकर समुदायास प्रोत्साहन देऊन महेशवर येथे हातमाग व्यवसायाची मूर्त रोवली. महेश्वरी साडी जगभर प्रसिद्ध झाली. तत्कालीन विधवा स्त्रियांना त्यांचे व्यापक अधिकार व पतीची मिळकत मिळवून देऊन काळाच्या पुढे जाऊन काम केले. धार्मिक जीवनापेक्षा त्यांचे राजकीय व सामाजिक जाणीव अधिक असणारे असे प्रगल्भ विशाल जीवन होते युद्धात रक्त सांडण्याऐवजी मार्ग काढण्यावर त्यांचा भर असे. वेळप्रसंगी मात्र कणखर भूमिका घेऊन त्यांनी आपल्या शौर्याचा परिचय करून दिला आहे. त्या स्वतः युद्ध कलेत निपुण होत्या. त्यांचे गुप्तहेर खाते अत्यंत दक्ष होते. राज्यातील सैन्याचा चोख बंदोबस्त ठेवत असत. त्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी शस्त्रास्त्र साठा सुसज्य ठेवत असत. राघोबा दादा राज्यावर चाल करून आल्यावर सभ्यपणे आपल्या राजेपणाला शोभेल अशा पद्धतीने राघोबा दादांची खोड बोलली जलसंधारण चळवळीचा पाया त्यांनी घातला त्यासाठी कुंडे, तलाव, विहिरी, बारव यांची निर्मिती केली. केदारनाथ येथील कुंड, वृंदावन येथील बारव त्यांनी तयार केले. महाराष्ट्रात त्यांनी वेरूळ येथे शिवतीर्थ नावाने बारवेचा जीर्णोद्धार केला. राज शिष्टाचारामध्ये त्या निष्णात होत्या, निर्भीड होत्या व स्वाभिमानीही होत्या. महिलांचे देखील सैन्य उभारले. त्या लढाऊ बाण्याच्या होत्या. दार्शनिक महाराणी संबोधून त्यांचा गौरव केला आहे. त्यांनी काशी येथे ब्रह्मपुरी या नावाने वेद विद्यापीठ करण्यासाठी प्रोत्साहन दिले. अहिल्यादेवींनी उभारलेली कायमस्वरूपी संस्कार केंद्रे आहेत. त्या राष्ट्रीय पाठशाळा आहेत. वाटसरूंच्या वाटेवर झाडे लावणे, पाणपोया लावणे, अन्नछत्रे लावणे या कामातून त्यांच्या लोकोत्तर कार्याची साक्ष पटते. प्रजावत्सल या शब्दाचा अर्थ त्यांच्या रूपाने होतो. जनतेच्या अडचणी समजून घेण्यासाठी त्या स्वतः लोकांपर्यंत पोहोचत. नवं सैनिकांना वेळेवर वेतन आणि त्यांच्या कुटुंबाची भरणपोषणाची जबाबदारी या गरजा त्या व्यक्तिगत मानत. त्यांनी जातीभेदा पलीकडे कार्य केले. आपली कन्या मुक्ताचा विवाह जातीभेदाचा विचार न करता यशवंत फणसे या कर्तबगार तरुणांसोबत लावून दिला भिल्ल, चोर, दरोडेखोर, लुटारूंचे मतपरिवर्तन करून त्यांना रोजगार देऊन विधायक कामात गुंतवले, त्यांना सैन्यातही दाखल करून घेतले. त्यांनी तब्बल 40 वर्षे राज्य कारभार साध्या घोंगडीवर बसून केला पण त्या लष्करी हिसका दाखवण्यात कणखर होत्या. शेवटच्या आजारपणात आयुष्यभर कष्ट, आप्तजनांच्या मृत्यूची मालिका, अंतर्गत आणि बाह्यगत कलह यानी थकलेले शरीर अशा स्थितीत त्या होळकरशाहीचा कारभार हाकत होत्या. मात्र 1795 यावर्षी जून-जुलै महिन्यात त्यांचा अंत झाला. अखेरचे दान त्यांनी गाय दिले.
आभार प्रदर्शन श्री. संजय चापोरकर यांनी केले. राष्ट्रगीत व पसायदानाने मा. पुष्पाताई पाटील यांनी सभेची सांगता केली. कार्यकारिणीतील सर्व सदस्यांनी मेहनत घेऊन सभा यशस्वी केली. श्री. जी. आर. ठाकूर यांनी उत्तम फोटो आणि व्हिडिओ घेतले.सभा उत्तम झाली.



