भुसावळ (प्रतिनिधी ) –
एकाच वेतनश्रेणीत अखंड बारा वर्ष आणि 24 वर्ष पूर्ण सेवा झालेल्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ आणि निवड श्रेणी मिळण्यासाठी आवश्यक असलेले सेवांतर्गत प्रशिक्षणाचा सोमवार दिनांक 2 रोजी राज्यभरात एकाच वेळी प्रारंभ झाला. यापूर्वी हे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने होत होते परंतु यावर्षी ते ऑफलाइन होत आहे. यामागे राज्य प्रशिक्षण परिषदेचा हेतू निश्चितच चांगला आहे मात्र प्रशिक्षणाला सुरुवात होऊन दोन दिवस झाले तरी तांत्रिक अडचणीमुळे प्रशिक्षणात मोठा व्यत्यय व गोंधळ निर्माण झाला. अनेक शिक्षकांची हजेरी लागली नाही तर अनेक शिक्षकांना प्रश्नपत्रिकाही फक्त होऊ शकली नाही प्रत्येक सत्र अखेर होणारी परीक्षा उत्तीर्ण होणे आणि ऑनलाइन हजेरी असणे अत्यावश्य असल्याने दिवसभर प्रशिक्षणाला उपस्थित राहूनही आपली अनुपस्थिती आणि परीक्षा न देऊ शकल्याने शिक्षकांना निष्कारण मानसिक त्रास सोसावा लागला विशेष म्हणजे सदर प्रशिक्षणासाठी प्रत्येक शिक्षकांकडून दोन हजार रुपये शुल्क आधीच वसूल करण्यात आले आहे शिवाय लांब अंतरावरून स्वखर्चाने शिक्षकांना प्रशिक्षण केंद्रावर वेळेवर पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. प्रशिक्षणार्थींच्या उपस्थितीमध्ये पारदर्शकता यावी आणि मूल्यमापन वस्तुनिष्ठ व्हावे या सद हेतूने ऑनलाइन घेणे हा हेतू निश्चितच चांगला आहे पण संभाव्य तांत्रिक अडचणी आधीच नजरेसमोर ठेवून यंत्रणा सुव्यवस्थित कार्यक्षम व बिनचूक करण्यात मात्र राज्य शैक्षणिक प्रशिक्षण व संशोधन परिषद अयशस्वी ठरली आहे

आम्ही उपस्थित असून परीक्षाही देणार होतो पण तांत्रिक अडचणीमुळे आमची प्रश्नपत्रिका आम्हाला उपलब्ध होऊ शकली नाही त्यामुळे आमचे काय होणार या भीतीने अनेक शिक्षकांनी मोबाईल वरून संपर्क साधला त्याची दखल घेऊन परीक्षा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करणार असून शिक्षकांनी घाबरून न जाता वेळेवर व शिस्ती त प्रशिक्षणाला सामोरे जावे कोणाचेही नुकसान होणार नाही असे आश्वासन भाजपा शिक्षक आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्य व संघटनेची ज्येष्ठ नेते प्र. ह.दलाल यांनी शिक्षकांना केले आहे.


