भुसावळ, (प्रतिनिधी.) केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या सुचनेनुसार भुसावळ येथील मंडळ रेल प्रबंधक कार्यालया मध्ये २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन व रेल्वे मध्ये होणारे अपघात या बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत मंडळ रेल प्रबंधक इति पांडे यांनी रेल्वे विभागाचे प्रमुख पदाधिकारी तसेच राज्य सरकारचे जिल्हा प्रमुख अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना रेल्वे प्रवासा मध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये. याबाबत काय उपाय योजना केल्या पाहिजेत यावर चर्चा करण्यात आली. पाचोरा येथे काही दिवसांपूर्वी रेल्वे अपघाताची जी दुर्दैवी घटना
घडली होती. तशी घटना पुन्हा घडू नये. यासाठी रेल्वे प्रशासना मार्फत मॉकड्रिल सारखे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले. रेल्वे सुरक्षा बाबत कशी काळजी घेतली पाहिजे याबाबत मंडळ रेल्वे प्रबंधक इति पांडे यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी
कृष्णात पिंगळे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उध्दव डमाळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, तालुका पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक उमेश महाले, आरपीएफ निरीक्षक आर मि यांच्यासह भुसावळ मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते…



