भुसावळ विभाग रेल्वे विद्युतीकरणाची १०० वर्षे साजरे ;

भुसावळ – भारतीय रेल्वे परिवर्तन, कार्यक्षमता आणि शाश्वततेचे १०० वर्षांचे प्रतीक म्हणून रेल्वे विद्युतीकरणाचे शतक अभिमानाने साजरे करत आहे. हा टप्पा रेल्वे पायाभूत सुविधा आणि कामकाजातील प्रगतीतील सातत्य अधोरेखित करतो, त्यामुळे वाहतूक अधिक पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम बनते.

विद्युतीकरणाचे शतक: १९२५ ते २०२५
भारतात इलेक्ट्रिक ट्रॅक्शनचा प्रवास दि. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी सुरू झाला, जेव्हा ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे (जीआईपीआर), ज्याला आता मध्य रेल्वे म्हणतात, बॉम्बे व्हीटी (आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) आणि कुर्ला हार्बर दरम्यान पहिली इलेक्ट्रिक ट्रेन (ईएमयू) चालवली. ज्यामध्ये १६ किमी अंतर असून १५०० व्होल्ट डीसी प्रणालीद्वारे चालणाऱ्या या ऐतिहासिक घटनेने भारतीय रेल्वेमध्ये स्टीम लोकोमोटिव्हपासून इलेक्ट्रिक ट्रॅक्शनकडे एक परिवर्तनकारी बदल घडवून आणला. तेव्हापासून, कार्यक्षमता वाढवून, कार्बन उत्सर्जन कमी करून आणि प्रवाशांच्या आरामात सुधारणा करून रेल्वे ऑपरेशनमध्ये क्रांती घडवून आणण्यात विद्युतीकरणाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

भुसावळ विभागात १००% विद्युतीकरण
भुसावळ विभागाने विद्युतीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून, आज त्याचे १००% विद्युतीकरण झाले आहे.भुसावळ विभागातील विद्युतीकरणाचा प्रवास खालीलप्रमाणे झाला

• भुसावळ ते इगतपुरी खंड एकूण रूट किलोमीटर ३०८ ( मे १९६९ मध्ये)
• भुसावळ ते खंडवा खंड एकूण रूट किलोमीटर १२४ (फेब्रुवारी १९९२ मध्ये)
• भुसावळ ते बडनेरा खंड एकूण रूट किलोमीटर २२० (फेब्रुवारी १९९० मध्ये)
• बडनेरा ते अमरावती खंड एकूण रूट किलोमीटर ०८ ( एप्रिल १९९४ मध्ये)
• जळंब ते खामगांव खंड एकूण रूट किलोमीटर १३ ( जुलै १९९४ मध्ये)
• चाळीसगांव ते धुळे खंड एकूण रूट किलोमीटर ५६ ( मार्च २०१९ मध्ये)
• बडनेरा ते वलगांव खंड एकूण रूट किलोमीटर २० ( जुलै २०१४ मध्ये)
• वलगांव ते चांदुर बाजार खंड एकूण रूट किलोमीटर २१ ( जुन २०१७ मध्ये)
• मनमाड ते अंकाई किल्ला (दौंड मार्ग) एकूण रूट किलोमीटर १६ ( जून २०२२ मध्ये)
• मनमाड ते अंकाई किल्ला ( औरंगाबाद मार्ग) एकूण रूट किलोमीटर १६ ( जून २०१४ मध्ये)
• जळगांव (पश्र्चिम रेल्वे मार्ग ) दुहेरीकरण एकूण रूट किलोमीटर २.५ ( नोव्हेंबर २०१७ मध्ये)

अनेक आव्हानांवर मात करून, या प्रयत्नांमुळे ऑपरेशनल कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे, रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारली असून पर्यावरणीय शाश्वततेला हातभार लागला आहे.

या ऐतिहासिक कामगिरीचे स्मरण करण्यासाठी, भुसावळ विभागाने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले. भुसावळ मंडळात ‘रेल्वे विद्युतीकरणाचे 100 वर्ष’ हा महत्त्वपूर्ण टप्पा भुसावळ रेल्वे स्थानकावर एका आकर्षक प्रदर्शनीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. ज्यामध्ये विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय प्रमुख म्हणून उपस्थित होते.

या प्रदर्शनीमध्ये विविध इंजिन मॉडेल्स तसेच ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन (OHE) शी संबंधित विद्युत उपकरणांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. रेल्वे विद्युतीकरणाच्या १०० वर्षांची कहाणी सांगणाऱ्या एका लघुपट दाखविण्यात आले. विशेष आकर्षण म्हणून एका इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हचा लघु मॉडेल प्रदर्शित करण्यात आला असून, त्यामध्ये लोकोमोटिव्हच्या गतीनुसार सिग्नलच्या पहलूमध्ये वास्तववादी बदल दिसून येतो, जे अत्यंत प्रभावी ठरत आहे. तसेच, स्टीम लोकोमोटिव्हपासून इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हकडे झालेल्या प्रवासावर आधारित एक माहितीपटदेखील प्रदर्शित करण्यात आला आहे.

रेल्वेच्या विद्युतीकरणाच्या 100 वर्षांच्या प्रवासातील महत्त्वाच्या उपलब्धींचे सादरीकरण या प्रदर्शनीत करण्यात आले आहे. विद्युतीकरण शताब्दी साजरी करण्यासाठी विभागातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर रोषणाई करण्यात आली. रेल्वे शालेय विद्यार्थ्यांसाठी रेल्वे विद्युतीकरणाच्या १०० वर्षांच्या प्रवासावर एक विशेष चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आले.

या समारंभाला विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रशासन श्री सुनील कुमार सुमन, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक तांत्रिक श्री एम के मीना, वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.

भुसावळ विभागाला या कामगिरीचा खूप अभिमान आहे आणि रेल्वे पायाभूत सुविधा आणि शाश्वत वाहतूक उपायांमध्ये पुढील प्रगतीसाठी वचनबद्ध आहे.