जळगाव,-

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक आज जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यलय जळगांव येथे केंद्रिय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आली होती.
यावेळी विकासात्मक कामे लवकर पूर्ण करून नागरिकांना प्रत्येक योजनेचा तत्काळ लाभ मिळवून द्यावा असे निर्देश देण्यात आले, तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मध्यान्ह पोषण आहार योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजना, अमृत योजना, रोजगार हमी, दीनदयाल विद्युतीकरण योजना, मूलभूत सुविधा प्रकल्प, डिजिटल इंडिया योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, स्वच्छ भारत योजना, उज्वल ईशुरंस योजना, सर्वशिक्षा योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, राष्ट्रीय भूमी अभिलेख यासारख्या विविध केंद्र सरकार पुरस्कुत योजनांसह दूरसंचार, महामार्ग, रेल्वे, खनिकर्म यासारख्या विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला.
यावेळी बैठक अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रक्षाताई खडसे व सहअध्यक्ष खासदार स्मिताताई वाघ यांच्यासह आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, ॲड.एसपी नखाते, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, डीएफओ जमीर शेख व सर्व विभागाचे संबंधित अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होता.


