नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींकडे दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा !

दिल्ली वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचा निकालमं गळवारी हाती आला आहे. एनडीएला २९४ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे देशात पुन्हा एनडीएचं सरकार येईल, हे स्पष्ट आहे. नवीन सरकार स्थापनेपूर्वी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा औपचारिक राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवला आहे. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता नवे सरकार स्थापन करण्यासाठीचा हालचाली सुरू झाल्या आहे. त्यासाठी आज संध्याकाळी एनडीएच्या घटक पक्षांची बैठक दिल्लीमध्ये होत आहे. या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवन येथे जात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याची भेट घेत त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच जुनी लोकसभा भंग करण्याची शिफारस केली आहे.काल लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमधून दहा वर्षांपासून देशात सत्ता असलेल्या भाजपाला मोठा धक्का बसला होता.

दोन वेळा बहुमतासह सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाला यावेळी बहुमताने हुलकावणी दिली. मागच्या वेळी ३०३ जागा जिंकणाऱ्या भाजपाला यावेळी २४० जागा मिळाल्या आहे. मात्र भाजपाच्या नेतृत्वाखील एनडीएला २९४ जागा मिळाल्या आहेत. मात्र भाजपाकडे स्वतःचं बहुमत नसल्याने भाजपासमोर सत्तास्थापनेसाठी अडचणी अडचणी येतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.