भुसावळ – भारतीय संविधानाच्या माध्यमातून व्यक्ती आणि देश सर्वश्रेष्ठ असून माणसाला त्याच्या अस्तित्वाची, त्याच्या स्वाभिमानाची, कर्तव्याची जाणीव करून देणारे संविधान जगात श्रेष्ठ असून गेल्या ७५ वर्षाचा इतिहास पाहता भारतीय संविधानाची वाटचाल हे निश्चितपणे माणसाच्या विकासाच्या पाऊलखुणा समृद्ध करणारी अशी आहे आणि यासाठीच व्यवस्था परिवर्तनाचा केंद्रबिंदू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या माध्यमातून भारतीय लोकशाही असल्याचे मत लेखक डॉ. मिलिंद बागुल यांनी भुसावळ येथील गुलमोहर प्रेस्टीज, अमरनाथ नगर, गजानन पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवेंद्र तायडे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी अभियंता सुभाष लोखंडे प्रा. डॉ. जतीन मेढे, दीपक जैन, माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर,जे. पी. सपकाळे, राजू गुजर, राजकुमार साळवे, विजय तायडे, सागर तायडे,के.बी.तायडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन डॉ.सुभाष झनके यांनी त्रिशरण पंचशीलाने सुरुवात केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.डी. तायडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुकेश सोनवणे, कपिल वानखेडे, दीपक बारी, मनीष मेश्राम, दिलीप लोखंडे, प्रशिक भालेराव, दिलीप तायडे, सुरेश इंगळे, सुरेश सुरवाडे यांनी मेहनत घेतली. याप्रसंगी विविध गुणदर्शनचा कार्यक्रम देखील कॉलनीतल्या बाल मंडळींनी सादर केला. कार्यक्रमास बहुसंख्येने कॉलनीतले महिला, पुरुष उपस्थित होते.


