भुसावळ – मणिपूर येथे प्रचंड हिंसाचार आणि महिलांवर अत्याचार होत असून महिलांना अक्षरशा निर्वस्त्र करून धिड काढली जात आहे त्यांच्यावर सामूहिक बलात्कार होत आहेत गेल्या ४ मे पासून हे सत्र सुरूच असून अद्याप केंद्र सरकार या घटनेचा गांभीर्यपूर्वक विचार करून तेथील दोषींवर कारवाई करताना दिसून येत नाही येथील हिंसाचाराच्या आणि महिलांवरील अत्याचाराचा घटना थांबवण्यासाठी केंद्र सरकार असमर्थ ठरत असून याचा निषेध म्हणून आज २४ जुलै रोजी भुसावळ प्रांताधिकारी व
तहसीलदार यांना येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था तसेच विविध संघटनातर्फे निवेदन देण्यात आले असून येथील दोषींवर त्वरित कारवाई करावी हा हिंसाचार व महिलांवरील अत्याचार त्वरित थांबवण्यासाठी केंद्र सरकारने ठोस उचलावीत अशी मागणी यात करण्यात आलेली आहे
यावेळी सखी श्रावणी संस्थेच्या अध्यक्षा सौ राजेश्री नेवे , राष्ट्रवादीच्या संगिता भामरे, वंदना सोनवणे, चांद तडवी, आम्रपाली, प्रतिमा ,यांचेसह बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या .



