पाणीपट्टी माफ करा– शिशिर जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भुसावळ:-गेल्या बऱ्याच वर्षांपासून भुसावळ शहरांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भुसावळ नागरिक त्रस्त झाले आहेत. भुसावळ शहराला तापी नदी हे वरदान असल्यावर देखील,मुबलक पाणी साठा उपलब्ध असून देखील भुसावळ कर नागरिकांना बारा ते पंधरा दिवसाआड कमी दाबाने रात्री बे रात्री कमी वेळ अशुद्ध ,अस्वच्छ, गढूळ, पाणीपुरवठा केला जातो.
भुसावळ यासाठी नागरिकांना जाणून वेठीस धरले जाते. भुसावळकर नागरिक नगरपालिकेचे नियमित पाणीपट्टी कर भरून देखील सुद्धा पिण्याचा पाण्यासाठी त्यांना वंचित ठेवले जात आहे. महिला भगिनी रात्रभर पिण्याच्या पाण्याची वाट बघत जागरण करीत असतात. पिण्याच्या पाण्यासाठीच्या यांच्या यंत्रांमध्ये कायम, कधी मोटर बंद पडते, कधी पिण्याच्या पाण्याच्यामोटर मध्ये गाळ साचतो , कधी पाण्याचा बंधारा वाहून जातो ,कधी मुख्य पाईपलाईन ना अनेकदा गळती लागते. कधी पिण्याच्या पाण्याचा आलम संपतो, सातत्याने भुसावळ नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जाणुन बुजुन दर 15दिवसांनी अशा पदधतीची मेंटेनांस ची कामे काढली जातात आणि पाण्याचा पुरवठा विलंबाने केला जातो. पिण्याच्या पाण्याचे प्रभाग निहाय कुठलेही प्रकारच नियोजन नसल्यामुळे तसेच वेळापत्रक नसल्यामुळे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मनाला वाटेल तेव्हा पाणीपुरवठा केला जातो. जाणून बुजून काही लोकांच्या फायद्यासाठी,कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जाते, तसेच काही ठेकेदारांच्या फायद्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या संबंधित मेंटेनन्स ची कामे मुद्दाम काढली जातात. पिण्याच्या पाण्यासाठी अधिकृत व्होलमन आहेत ते कुणालाच कळत नाहीं. आणि अधिकृत व्होलमन सोबत नगरपालिका प्रशा सनाने नॉन टेक्निकल हंगामी कर्मचारी नेमले आहेत. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे व्हॉल्व नाल्या मध्ये आहे. त्यामुळे ज्यावेळी तो व्हॉल्व सोडला जातो तेव्हा त्या व्हॉल्व मध्ये नाल्या च पाणी मिक्स होतं . भुसावळ नगरपरिषदेच्या भोंगळ आणि नियोजनशून्य ढसाळ कारभाराविरुद्ध शेकडो तक्रारी पानि ग्रस्त भुसावळ कर सातत्याने करीत आहेत मात्र भुसावळ न. पा प्रशासन आणि जळगाव जिल्हाअधिकारी प्रशासान सुध्दा दुर्लक्ष करीत आहेत. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वे ठीस धरणाऱ्या आणि वंचित ठेवणाऱ्या, व नियमित वर्षभरातून काही दिवस अपूर्ण अस्वच्छ, अनियमित कमी दाबाने पाणीपुरवठा करणारे मात्र पि ण्याच्या पाण्यासाठी पाणीपट्टी कर जनतेकडून सक्तीने वसूल करणाऱ्या भुसावळ नगरपालिकेने गेल्या २ वर्ष ते आता पावेतो चालू २०२२-२३ ची संपुर्ण पाणी पट्टी( कर )त्वरित माफ करावी . तसेच तीन ते चार वर्षांपासून भुसावळ शहरात बंद पडलेली अमृत योजनेचे काम त्वरित सूरू व्हावीत. व अमृत योजने साठी च्या कंपनीला शासनाने ठेका दिला आहे त्या कंपनीने विहित मुदतीत अमृत योजनेचे काम पूर्ण केले नसल्यानेत्याची सुद्धा उच्च स्तरिय चौकशी होउन सदर कंपनीस ब्लॅक लिस्ट करून कारवाई करावी. तसेच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष भुसावळ शहरात येऊन पिण्याच्या पाण्याची समस्या कायम दूर व्हावी यासाठी जनता दरबार आयोजित करावा. अशा आशयाचे एक विनंती पत्र व मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे केली असल्याच त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविलेले आहे.