भुसावळ : शहरासह तालुक्यात 27 व 30 एप्रिल रोजी झालेल्या मुसळधार अवकाळी पावसासह गारपीटीमुळे मकासह सूर्यफुल, उन्हाळी कांदा, केळी व पपईचे 251.96 हेक्टरवर नुकसान झाले तर 56 घरांवरील पत्रे उडाल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली.
भुसावळ तालुक्यात 155 कांदा उत्पादकांचे 96.29 हेक्टरवर, 118 निंबू उत्पादकांचे 103.42 हेक्टरवर, 27 मका उत्पादकांचे 33.39 हेक्टरवर, 12 पपई उत्पादकांचे 6.86 हेक्टरवर, सहा टरबूज उत्पादकांचे 2.40, 65 केळी उत्पादकांचे 61, एका आंबा उत्पादकाचे एक हेक्टरवर तसेच 12 बाजारी उत्पादकांचे 7.10, 24 दादर उत्पादकांचे 8.76 हेक्टरवर नुकसान झाले आहे. एकूण 420 शेतकर्यांचे 319.87 हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.



