भुसावळ – भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक 23 मधील देना नगर, सुरभी नगर आनंद नगर, मुक्तानंद कॉलोनी,गोविंद कॉलोनी,सह इतर विविध परिसरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. रस्ते खिळखिळे झाले आहेत. तसेच या परिसरासह इतर परिसरातील गटारी प्रचंड तुंबलेल्या व तुटलेल्या आहेत. प्रचंड अस्वच्छता त्या ठिकाणी आहे. नाले सुद्धा बऱ्याच प्रमाणात तुंबलेले आहेत. या प्रभागातील काही भागात रस्त्यांचे कित्येक महिन्यांपासून डांबरीकरण रखडलेले आहे. त्यामुळे त्या रस्त्यांची सुद्धा दुर्दशा झालेली आहे . तसेच अनेक विकास कामे प्रलंबित आहेत. काही भागांमध्ये रस्त्याचे जे कॉंक्रिटीकरण झालं हेसुद्धा निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. त्यामुळे त्वरित युद्धपातळीवर सदर प्रभागातील अपुरे रस्त्याची काम, तुंबलेल्या व तुटलेल्या गटारी, अस्वच्छता, आठ हजारच्या वर असलेल्या या प्रभागात लोकसंख्या असलेल्या प्रभागात अत्यल्प स्वच्छता कर्मचारी आहेत, कचरा कुंड्यांची व्यवस्था नाही. मुतारी व्यवस्था नाहीत, प्ले ग्राउंड, गार्डन्स नाहीत. या प्रभागातून जाणारा रिंग रोड अपूर्ण अवस्थेत आहे. यासह अनेक विविध मूलभूत अपुऱ्या सेवा सुविधांच्या या प्रभागात आपण प्रत्यक्ष पाहणी दौरा
करून या सर्व समस्या त्वरित सोडवाव्यात व जनता दरबाराचे आयोजन करण्याची मागणी तसेच या प्रभागातील वरील सर्व समस्या त्वरित न सोडवल्यास याविरुद्ध लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल. असे हि त्यांनी जळगाव जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांना पाठविलेल्या निवेदनात नमुद केले असल्याचे शिशिर दिनकर जावळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.



