भुसावळ – विकास कामासाठी किंवा कुठल्याही शासकीय प्रकल्पासाठी जमिनी ताब्यात घ्यावे लागतात मात्र हे काम करतांना तेथील रहिवाशांच्या निवाऱ्याची व्यवस्था करणे देखील गरजेचे आहेत परंतु भुसावळातील रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण धारक बेघर झाले असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महा विकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे केंद्र शासनाची घरकुल योजना चांगली केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून विस्थापित झालेल्यांना हक्काचे घर मिळवून देणार, तसेच पालिका इमारतीसाठी 5 कोटींचा निधी देण्याची ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

भुसावळ येथील डी एस ग्राउंड मैदानावर आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकर, माजी खासदार ईश्वरलाल जैन, विधानसभा माजी सभापती अरुणभाई गुजराती, जिल्हा बँक संचालक ऍड रोहिणी खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा निरीक्षक अविनाश अदिक, नगराध्यक्ष रमण भोळे, आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार
उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यावेळेस त्यांनी शपथ घेतली त्या वेळेस कर्जमाफीची योजना जाहीर केली होती. ती कर्जमाफीची योजना अमलात आली पण त्यावेळेस 100टक्के कर्जफेड करणाऱ्या सभासदांना प्रोत्साहन 50 हजार रुपये देण्याचं ठरलं होतं आणि दोन लाखाच्या पेक्षा वर त्यांचे कर्ज आहेत त्यांनादेखील दोन लाखावर पर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोनामुळे अर्थव्यवस्था थोडीशी बिघडलेली आर्थिक बाबतीमध्ये अडचणी आल्या. परंतु आता परिस्थिती बदलत आहे आणि दिवसेंदिवस अशाच पद्धतीने सुधारत गेली तर वेळेमध्ये परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान अनुदान आहे ते महा विकास आघाडीचे सरकार शंभर टक्के दिले जाणार अशा प्रकारचा शब्द मंत्री या नात्याने मी तुम्हाला देतो त्याच बरोबर दोन लाखाच्या वरच्या देखील शेतकऱ्याला महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, स्वतः छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण यांची चर्चा झालेली आहे त्याचाही लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नाथाभाऊ सारख्या 52 कशी नेतृत्वाची किंमत राष्ट्रवादीला कळली
जळगावच सोनं शुध्द सोनं म्हणून ओळखले जाते. मात्र या सोन्याची किमत सर्वांनाच कळते असे नाही. जळगावचे सुपुत्र लोकनेते नाथाभाऊ यासारख्या भाजपला कदर नाही. त्यांची किंमत त्यांची कदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कळली आणि आमच्या आग्रहाला मान देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याचे अजित पवार म्हणाले.
चार दिवस सासूचे चार सुनेचे…
भाजपने नाथाभाऊ याना अपमानास्पद वागणूक दिली. त्यांच्यावर अनेक खोटेनाटे आरोप करण्यात आले. त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारच्या चौकशा लावण्यात आलेल्या अशा पद्धतीनं हे जे काही चाललंय हे महाराष्ट्रामध्ये कधी पाहिलं नव्हतं. आजपर्यंत विरोधकांना असा त्रास कुणी दिला नाही, चार दिवस सासूचे असले तरी चार सुनेचे येतात. घेत असतात या जगात नाही किती त्याच्यामध्ये शेवटी जनतेच्या मनामध्ये आल्यानंतर डोक्यावर घेते संपूर्ण सूत्र त्यांच्या हातामध्ये आहे.
नाथाभाऊ अगोदर आले असते तर चित्र वेगळं असतं
जळगाव जिल्हा राष्ट्रवादीमध्ये साहेबराव पाटील सोडले तर जवळपास सहा आमदार दिले होते. मागील काळात थोडासा राष्ट्रवादीला फटका बसला. आता नाथाभाऊ आले आहेत, नाथा भवणे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर निर्णय घेतला असता तर जिल्ह्यातील चित्र वेगळे असते. परंतु आता यापुढे नाथाभाऊंच्या
नेतृत्वाखाली जिल्हा नक्कीच राष्ट्रवादीमय होईल यात शंका नाही, असे श्री पवार म्हणाले.
मसाका सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार
माजी आमदार संतोष चौधरी यांनी मधुकर साखर कारखाना सुरू करण्याची मागणी मंचावर केली असता, याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, जिल्ह्यात जे टी महाजन असोत किंवा मधुकरराव चौधरी असो यांनी सहकाराच्या माध्यमातून विविध संस्था उभा केला त्यातून अनेक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. मात्र नंतरच्या काळात या संस्था अडचणीत आले असून मधुकर कारखाना सध्या बंद अवस्थेत आहे. यासंदर्भात सहकार मंत्र्यांशी चर्चा करून शेतकरी हिताचा निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली.
जुनं नवं भेद करू नका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून या ठिकाणी नवीन कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे सगळेसोबत घेऊन जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवायची आहे. , जुने नवे असा भेदभाव न ठेवता सर्वांनी एकजुटीने काम करा समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवा असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.


