वरणगाव सह परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तर्फे पाहणी


भुसावळ – तालुक्यातील वरणगाव सह परिसरातील जाडगाव मन्यारखेडा या भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीपिकांसह मुख्यत्वे कपाशी व केळीचे खूप नुकसान झालेले आहे या झालेल्या नुकसानीची पाहणी व शेतकऱ्यांना मदत व्हावी या दृष्टीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्यासह व उपजिल्हा संघटक विलास मुळे पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे उपजिल्हा संघटक अल्पसंख्यांक सहिद मुल्लाजी यांच्यासह प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन शेतकऱ्याचे संवाद साधत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व पाहणी केली
यावेळी भुसावळचे तहसीलदार तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, मंडळाधिकारी व तलाठी यांचेशी संपर्क करून तातडीने पंचनामे करून घेतले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी तसेच विमा धारकांनी त्वरित संबंधित विमा कंपनीला कळवण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे व शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करून शिवसेनेचे पदाधिकारी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई व विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.