मुंबई –
राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनानं मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्यामुळे राज्यातील १८ जिल्हे अनलॉक होणार असून त्यामध्ये जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्ह्याचा देखील समावेश आहे.

लॉकडाऊन शिथील करण्यासाठी 5 लेव्हल ठरवल्या आहेत. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्याच्या आत व्यापलेले असेल, तिथे सर्व गोष्टी सुरु होतील.
काय सुरु राहणार?
रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सूट दिली आहे. ई कॉमर्स सुरू राहिल, पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार, बस 100 टक्के क्षमतेने, इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल, अशीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली. पहिल्या लेव्हलमध्ये हे सगळं सुरू असणार आहे.
अनलॉक कोणत्या टप्प्यात होणार
पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे
दुसर्या टप्प्यात 5 जिल्हे
तिसरा 10 जिल्हे
चौथ्या टप्प्यात 2 जिल्हे
लेवल एकमध्ये येणारे जिल्हे
औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर,धुळे गडचिरोली गोंदिया जळगाव, जालना लातूर नागरपूर नांदेड नाशिक परभणी,ठाणे ,वर्धा. वाशिम .यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे.


